आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाठी ८ चित्रपट निर्मित करूनही प्रदर्शित न झाल्याने दिला राजीनामा: मुकेश खन्ना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेतील भीष्म पितामह, ‘शक्तिमान’ मालिकेतील नायक मुकेश खन्ना यांनी काही दिवसांपूर्वी चिल्ड्रन फिल्म सोसायटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ते भोपाळमध्ये आले होते. या वेळी बोलताना खन्ना म्हणाले, मी तेथे माझे मत कोणी विचारात घेत नव्हते, म्हणून मी राजीनामा दिला. मुलांसाठी चित्रपट निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारकडे निधी नाही. गेल्या तीन वर्षांत ८ चित्रपटांची निर्मिती केली. पण हे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकले नाहीत.’

 

मुलाखत: मुकेश खन्‍ना

- माझीच नव्हे तर मुलांची तक्रार आहे की, त्यांच्यासाठी चित्रपट निर्माण होत नाहीत.

चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीमध्ये चेअरमन म्हणून कार्यरत असताना माझा कार्यकाळ तीन महिन्यांत संपणार होता. तीन महिन्यांनंतर मी जाणारच होतो. परंतु माझी काही मते व्यक्त करूनच आपण राजीनामा द्यावा, असा विचार होता. हे केवळ माझेच नव्हे तर मुलांनाही तसेच वाटत होते.   


- तीन वर्षांच्या कारकीर्दीत मी मुलांसाठी ८ चित्रपट तयार केले.
हे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावेत, अशी इच्छा हाेती. नंतर वाटले, चित्रपट महोत्सवात तरी हे चित्रपट प्रदर्शित व्हावेत अशी इच्छा होती. पण तीन वर्षे झाली पण काही निष्पन्न झाले नाही. माझा राजीनामा देण्यामागे हे एक मुख्य कारण होते.  


- गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मागणी करत होतो.
मी सोसायटीमध्ये येण्याचा उद्देश मुलांसाठी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्याचा होता. मुलांना  चित्रपटगृहात जाऊन हे चित्रपट पाहता यावेत, असाही उद्देश होता. परंतु अशा चित्रपटाच्या निर्मितीसाठी निधीची कमतरता आहे. मी निधी मिळवण्यासाठी दोन वर्षांपासून खूप प्रयत्न केले. पण यश मिळाले नाही.

 
- पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट तुम्हाला मिळू शकली नाही.
राजीनामा पाठवल्यानंतर तो १७ दिवस उशिरा मंजूर करण्यात आला. स्मृती इराणी यांची भेट घेण्यासाठी चार पत्रे लिहिली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. चार महिने उलटून गेले पण त्यांच्याकडूनही काही उत्तर आले नाही.

बातम्या आणखी आहेत...