आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Muslims Should Gifat The Place Of Ram Mandir To Visit Hindus'; Sri Sri Ravi Shankar's Efforts To Reconcile

‘मुस्लिमांनी राम मंदिराची जागा हिंदूंना भेट द्यावी’ ; श्री श्री रविशंकर यांचे समेटाचे प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राम जन्मभूमी मंदिराची जागा मुस्लिम समुदायाने हिंदूंना भेट स्वरूपात द्यावी, असे मत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी मांडले आहे. आखाडा परिषदेने यात मध्यस्थी न करण्याचा इशारा दिल्यानंतरही श्री श्रींची याविषयी भूमिका मांडणे सुरू आहे. आपण सरकारच्या संपर्कात नसून स्वयंप्रेरणेने अयोध्या मुद्द्यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोर्टाबाहेरच यातून तोडगा निघू शकतो, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.  


६१ वर्षीय आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी यासंदर्भात शिया, सुन्नी धर्मगुरूंशी बातचीत केली होती. कोर्टाचा निर्णय कोणत्याही समुदायाविरुद्ध गेला तर रक्तपात निश्चित असल्याने कोर्टाबाहेरच यातून तोडगा काढण्यावर आपण भर देत असल्याचे ते म्हणाले. रामाचा जन्म झाल्याचे हे स्थळ असून मुस्लिमांसाठी याचे धार्मिक महत्त्व तितके नाही. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचे महत्त्व जाणून त्यांनी हे स्थळ भेट स्वरूपात द्यावे, असे श्री श्री म्हणाले. ‘विन-विन’ तत्त्वाप्रमाणे यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राम जन्मभूमी मुद्द्यावरून देशात धार्मिक तेढ वाढत आहे. मैत्रीपूर्ण मार्गाने यावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे पत्रपरिषदेत ते म्हणाले.  सुन्नी विचारवंत मौलाना सलमान नदवी यांनी १० फेब्रुवारी रोजी रविशंकर यांना सहमती दर्शवली होती. त्यानंतर त्यांना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डातून (एआयएमपीएलबी) बडतर्फ करण्यात आले होते.  

बातम्या आणखी आहेत...