आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागालँडमध्ये भाजप आघाडीचे सरकार, रियो चौथ्यांदा बनले CM; राजभवनाबाहेर शपथविधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
कोहिमा - नागालँडमध्ये गुरुवारी भाजप आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) चे नेफ्यू रियो चौथ्यावेळी मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्याबरोबर 11 कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. प्रथमच राजभवनाबाहेर कोहिमाच्या स्थानिक मैदानावर शपथविधी सोहळा झाला. या मैदानातून 1963 मध्ये राज्याच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती. शपथविधीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि भाजपचे सरचिटणीस राम माधव उपस्थित होते. रियो नॉर्थन अंगामी-II मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते. 
 
प्रथमच राजभवनाबाहेर शपथविधी 
- नागालँडमध्ये नवनियुक्त मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांनी कोहिमाच्या लोकल ग्राऊंडमध्ये शपथ घेतली. 
- नागालँडमध्ये प्रथमच सरकारचा शपथविधी राजभवनाबाहेर झाला. राजभवनाबाहेर शपथ घेणारे रियो हे पहिलेच नेते ठरले. 
- हे ग्राऊंड यासाठीही महत्त्वाचे आहे की, 1 डिसेंबर 1963 ला येथूनच तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी नागालँड राज्याची घोषणा केली होती. 
 
रियोंची निवड का
नेफ्यू रियो, एनडीपीपी (भाजपचा मित्रपक्ष)
वय : 67 वर्षे 
मतदार संघ : नॉर्दर्न अंगामी-2, बिनविरोध निवडले गेले 
 
- 15 वर्षांपासून नॅशनल पिपल्स फ्रंट (एनपीएफ) ची सत्ता आहे. पूर्वी त्याला भाजपचा पाठिंबा होता. या पक्षाची सत्ता असताना नेफ्यू रियो तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. 
- एनपीएफमधून बाहेर पडल्यानंतर नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) स्थापन केली. या पक्षाला भाजपचा पाठिंबा आहे. रियो याच गटातील आहेत. भाजप आणि एनडीपीपीने 30 जागा जिंकल्या आहेत. दोन अपक्षांचाही विजय झाला आहे. त्यांच्यापैकी एक भाजपच्या गटात आला तरी त्यांची सत्ता येऊ शकते. एनडीपीपीने रियो यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले आहे. 
 
रियोंविरोधात लढायला कोणीही पुढे आले नाही 
- नॉर्दर्न अंगामी-2 मतदारसंघातून ते उमेदवार होते. बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांना खासदारकीचा राजीनामा दिला होता. 
 
दीमापूरमधून त्रिपुराचे एकमेव खासदार 
- 2014 मध्ये ज्या दोन मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यापैकी एक होते नरेंद्र मोदी आणि दुसरे होते रियो. 
- राज्यातील नागा समस्या संपवण्याचे आश्वासन देऊन ते केंद्रात गेले होते. ते दीमापूरचे खासदार होते. त्रिपुराचे ते एकमेव खासदार होते. 
 
नागालँडमध्ये कोणाला किती जागा? 
बहुमत : 31/60 
एनपीएफ 27
कांग्रेस 00
बीजेपी+ एनडीपीपी 28 (12+16)
 
नकारानंतर जेलियांग यांचा राजीनामा 
- राज्याचे मुख्यमंत्री टीआर जेलियांग यांनी आधी राजीनामा द्यायला नकार दिला होता. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे एनपीएफने म्हटले होते. 
- पण बुधवारी त्यांनी राज्यपाल पीबी आचार्य यांच्याकडे राजीनामा सादर केला. आगामी सरकार स्थापन होईपर्यंत सरकार सांभाळण्याच्या सूचना त्यांना राज्यपालांनी केल्या. 
 
 
बातम्या आणखी आहेत...