आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेशात आहेत. याठिकाणी त्यांनी दोर्जी खांडू राज्य सभागृहाचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले, आता सरकार दिल्लीतून नाही तर देशातील अनेक भागांचे लोक चालवत आहेत. पंतप्रधान येथून त्रिपुरालाही जाणार आहेत. त्याठिकाणी ते दोन प्रचारसभा घेतील. 60 सदस्यांच्या त्रिपुरा विधानसभेसाठी 18 फेब्रुवारीला निवडणुका होतील. भाजपने 51 उमेदवार मैदानात उतरवले आहेत तर, त्यांची आघाडी आसलेल्या 'इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा' (आयपीएफटी) ने 9 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
मोदी म्हणाले, पैसे कसे वाचवायचे हे आम्हाला चांगलेच ठाऊक
- पूर्वी सरकार विखुरलेले असायचे. कोणी इकडे बसायचे तर कोणी तिकड. कामाचे वातावर कसे आहे, याचा कामावर परिणाम होतो. एकाच कॅम्पसमध्ये सर्व युनिट असल्याने सामान्य लोकांना सुविधा झाली आहे.
- दोरजी खांडू सेक्रेटरिएटचे लोकार्पण करताना मला अभिमान होत आहे.
- आम्ही सरकारमधअये एक प्रयोग सुरू केला आहे. दिल्लीहून सरकारल चालत असल्याला 70 वर्षे झाली आहेत. लोक दिल्लीकडे पाहायचे. आता दिल्लीहून नव्हे देशातील अनेक भागांतून लोक सरकार चालवत आहेत.
काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांवर टीका
- मोदी म्हणाले, अरुणाचलमध्ये मोरारजी देसाई आले होते. इतर कोणीही पंतप्रधान आला नाही. पंतप्रधान व्यस्त असतात. गेल्या 3 वर्षांपासून आमचे मंत्री ईशान्येतील विविध भागांमधून आलेले आहेत.
- देशात आरोग्याच्या क्षेत्रात बरेच काही करण्याची गरज आहे. आम्ही हेल्थ सेक्टर अधिक मजबूत व्हावे, म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. 3 लोकसभा मतदारसंघात एक वैद्यकीय महाविद्यालय असावे अशी इच्छा असल्याचेही मोदी म्हणाले.
- आम्ही देशात वेलनेस सेंटर तयार करणार आहोत. त्याचाही देशाला फायदा होईल. आम्ही देशातील सर्व पंचायतींपर्यंतही पोहोचू.
त्रिपुरात डाव्यांना मात देण्याचा प्रयत्न
- भाजपने त्रिपुरामधील माणिक सरकार यांच्या नेतृत्वातील डाव्यांच्या सरकारला मात देण्यासाठी अखेरचा डाव खेळला आहे. त्यासाठीच पंतप्रधान येथील दौऱ्यावर आहेत.
- याठिकाणी मोदी दक्षिण त्रिपुरा जिल्ह्याच्या शांतीर बाजारात पहिली सभा घेतील. त्यानंतर ते राजधानी आगरतळामध्ये एका सभेला संबोधित करतील.
मोदींनी माणिक सरकारवर केली होती टीका
मोदींनी त्यांच्या निवडणूक रॅलीमध्ये माणिक सरकारवर टीका करत म्हटले होते की, या राज्याला चुकीचा 'माणिक' भेटला आहे. त्यांना 'हिरा' मिळणए गरजेचे आहे. माणिक चुकीच्या पद्धतीने धारण केला तर नुकसान होते. हिरा म्हणजे हायवे, आयवेज, रोड्स आणि एअरवेज.
60 जागांसाठी 18 फेब्रुवारीला मतदान
- त्रिपुरामध्ये 12व्या विधानसभेसाठी 18 फेब्रुवारीला मतदान होत आहे. याठिकाणी 60 जागांसाठी मतदान होईल. 3 मार्चला मेघालय आणि नागालँडबरोबर निकाल लागतील.
- सध्या येथे माकपचे माणिक सरकार यांची सत्ता आहे. सरकार 20 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. 2013 च्या निवडणुकीत भाजपला इथे एकही जागा मिळाली नव्हती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.