आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेते लष्कर प्रमुखांचा-शहीदांचा अवमान करतात, कलबुर्गी येथील सभेत नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी 1 मे पासून कर्नाटकमध्ये भाजपच्या प्रचाराला सुरुवात केली. - Divya Marathi
मोदींनी 1 मे पासून कर्नाटकमध्ये भाजपच्या प्रचाराला सुरुवात केली.

बंगळुरु - कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. भाजपच्या प्रचाराने वेग पकडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची फौज आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही आज कर्नाटकात आहेत. नरेंद्र मोदींची आज (गुरुवार) पहिली प्रचारसभा कलबुर्गी येथे झाली. मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष केले. ते म्हणाले, देशाच्या लष्कर प्रमुखांना आणि लष्कराला कधी कोणी गुंड म्हणू शकते का? देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्यांना एखादी निरक्षर व्यक्तीही नाव ठेवत नाही, मात्र लष्कराला गुंड म्हणणाऱ्यांना काँग्रेसने पक्षातून काढले का? मोदी म्हणाले, काँग्रेसने देशाच्या शहीदांचा अवमान केला आहे. मोदी बुधवारपासून कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या बेल्लारी आणि बंगळुरु येथेही प्रचारसभा होणार आहेत. 

 

आमचे सरकार तुमच्यासाठी काम करणार - मोदी 
- कलबुर्गी येथील सभेत मोदी म्हणाले, 'कर्नाटकच्या जनतेने संकल्प केला आहे की पाच दशके वाया गेली, आता एकही क्षण वाया घालवायचा नाही. संपूर्ण देशातून काँग्रेसची सुट्टी होत आहे. गेल्या 4 वर्षांत देशातील प्रत्येक ठिकाणी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.'
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल नवा विश्वास आणि उत्साह निर्माण झाला आहे. ही निवडणूक कर्नाटकच्या युवकांचे भविष्य बदलणारी आहे. माता-भगिनींच्या सुरक्षेची ही निवडणूक आहे. 
- मोदी म्हणाले, मी तुम्हाला विश्वास देतो को भाजपचे सरकार कर्नाटकच्या जनतेच्या खांद्याला खांदा लावून काम करेल. 

 

सरदार पटेलांचा उल्लेख होताच एका कुटुंबाची झोप उडून जाते 
- मोदी म्हणाले, 'सरदार पटेलांचे कलबुर्गीसोबत घनिष्ठ नाते होते. जेव्हा निजामाने कलबुर्गी सोडण्यास नकार दिला होता, तेव्हा पटेलांनी त्याला नमवले होते.'
- 'जेव्हा-जेव्हा सरदार पटेलांचा उल्लेख होतो, देशातील एका कुटुबांची झोपच उडून जाते. काँग्रेसने सरदार पटेलांचा कायम तिरस्कार केला. तो त्यांचा स्वभावच होता. शहीदांचा, देशभक्तांचा अवमान करणे हेच काँग्रेस करत आली आहे.'

 

काँग्रेसने सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित केले 
- नरेंद्र मोदी म्हणाले, 'आमच्या पराक्रमी सैनिकांनी दहशतवाद्यांच्या किल्ल्यात घुसून सर्जिक स्ट्राइक केले, तेव्हा काँग्रेसने निर्लज्जांसराखे देशासाठी जीव देणाऱ्यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित केला. तुम्हाला जर पुरावाच पाहिजे होता तर पाकिस्तानला ट्रकांमध्ये मृतदेह घेऊन जाताना पाहायचे होते.'

 

लष्कर प्रमुखांना गुंड म्हणणाऱ्यांना काँग्रेसने का काढले नाही 
- मोदी म्हणाले, या देशात निरक्षर व्यक्तीनेही कधी लष्कर प्रमुखांना गुंड म्हणण्याचे पाप केले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांना गुंड म्हणणाऱ्यांना काँग्रेसने पक्षातून काढले का नाही? 
- कलबुर्गीमध्ये डाळींचे विक्रमी उत्पादन होते. सहाजिक आहे की येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतला असेल. मात्र कर्नाटकचे काँग्रेस सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. 

 

21 सभांतून 215 विधानसभा मतदारसंघ कव्हर करणार 
- कर्नाटकमध्ये नरेंद्र मोदी 15 जाहीर सभा घेणार असल्याचे म्हटले जाते. बुधवारी त्यांनी तीन सभा घेतल्या तर गुरुवारी ते तीन सभांना संबोधित करणार आहेत. मोदींचा आगामी प्रचार दौरा 5 मे पासून सुरु होणार आहे. यामध्ये ते टुमकुर, शिवमोगा (शिमोगा) आणि गडाग येथे प्रचारसभा घेणार आहेत. या तीन सभांतून मोदी 49 जागा कव्हर करणार आहेत. 
- 7 मे रोजी मोदी रायचूर, चित्रदुर्ग, कोलार आणि 8 मे रोजी विजयवाडा, मंगळुरु येथे प्रचार सभा घेणार आहेत. या दोन्ही सभांमधून ते 65 मतदारसंघ कव्हर करणार आहेत. 
- कर्नाटकमधील 224 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 15 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. 

बातम्या आणखी आहेत...