आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीजिंग/वुहान - नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा चीन दौरा शनिवारी संपला. दोन दिवसांत राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत त्यांची सहावेळा भेट झाली. या दरम्यान उभय नेते 9 तास सोबत होते. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, अर्थात शनिवारी सकाळी दोन्ही नेत्यांनी वुहान येथील इस्ट लेकच्या किनाऱ्यावर 'चाय पे चर्चा' केली. मोदी जिनपिंग यांनी नावेतून प्रवासही केला. मोदी-जिनपिंग यांनी एकत्र लंच केला. दोन्ही नेत्यांदरम्यान चार मुद्द्यांवर एकमत झाले. त्यात सीमारेषेवर शांतता, अफगाणिस्तानसोबत सहकार्य, विशेष प्रतिनिधी नियुक्त करणे आणि दहशतवादाला विरोध या चार मुद्द्यांवर उभय नेत्यांचे एकमत झाले. त्याआधी शुक्रवारी मोदी आणि जिनपिंग यांच्यात 3 भेटी झाल्या. अनौपचारिक चर्चेची परंपरा सुरु केली पाहिजे असे सांगित मोदींनी जिनपिंग यांना पुढील वर्षी भारतभेटीचे निमंत्रण दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात शुक्रवारपासून दोन दिवसीय अनौपचारिक शिखर बैठक सुरू झाली होती. कोणत्याही अजेंड्याविना व संयुक्त वक्तव्याविना झालेल्या या बैठकीत दोन्ही देशांत मैत्रीचा धागा जोडण्याचा प्रयत्न झाला.
पहिल्याच दिवशी जिनपिंग-मोदी तीन वेळा भेटले. या वेळी मोदी म्हणाले, जगात शांतता, स्थैर्य प्रस्थापित करून समृद्धी आणण्याच्या दृष्टीने भारत-चीनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिष्टमंडळाशी चर्चा करताना मोदी जिनपिंग यांना म्हणाले की, दोन्ही देशांत जगातील 40 टक्के लोकसंख्या राहते. त्यामुळे दोन्ही देश मिळून जगाच्या अनेक अडचणी सोडवू शकतील. विशेषत: जागतिक शांततेच्या दृष्टीने दोन्ही देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
गेल्या दोन हजार वर्षांपासून भारत व चीन या देशांनी एकत्रितपणे जागतिक अर्थव्यवस्थेला गती दिली आहे. सुमारे 1600 वर्षे याच देशांचे वर्चस्व राहिल्याचा इतिहास आहे, असे मोदी म्हणाले. अनौपचारिक चर्चेची मालिका सुरू करण्याचा मनोदय व्यक्त करून मोदींनी जिनपिंग यांना भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले.
जिनपिंग म्हणाले, अशात या दोन्ही देशांत सहकार्याच्या दृष्टीने चांगली प्रगती झाली आहे. गेल्या पाच वर्षांत बरेच काही लाभही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत-चीनमधील 260 कोटी लोकसंख्या विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारी आहे. आशियातील या भागात दोन्ही देशांचा प्रभाव वाढत चालला असल्याचेही जिनपिंग यांनी नमूद केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.