आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींच्या लाच प्रकरणी राज्यसभा सदस्य सुभाष चंद्रा, माजी खासदार जिंदाल यांच्यात अखेर समेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिस्सार - कोळसा खाण वाटपाच्या बातम्यांसदर्भात 100 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी राज्यसभा सदस्य डॉ. सुभाष चंद्रा आणि माजी खासदार नवीन जिंदाल यांच्यात समेट घडून आला आहे. नवीन जिंदाल यांनी शुक्रवारी चंद्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली. यासंदर्भातील फोटो आणि एक ट्वीट शेअर करून त्यांनी तब्बल 6 वर्षांच्या वादाला विराम बसल्याचे स्पष्ट केले. जिंदाल काँग्रेसमधून भाजपमध्ये येणार अशी चर्चा रंगली होती. त्यात हा समझोता झाल्याने त्या चर्चेला आणखी उधाण आले आहे. एवढेच नव्हे, तर नवीन जिंदाल लोकसभा निवडणुकीत कुरुक्षेत्र येथून भाजपचे उमेदवार असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. जिंदाल आणि सुभाष चंद्रा यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी केंद्रीय मंत्री, माजी उप-मुख्यमंत्री आणि अनेक उद्योजकांनी प्रयत्न केले होते. अखेर 6 वर्षांनंतर एका वरिष्ठ भाजप नेत्याच्या मध्यस्थीने दोघांनी आपल्यातील वाद मिटवला असे सुत्रांकडून समजते. 


असे होते प्रकरण
2012 मध्ये तत्कालीन काँग्रेस खासदार आणि जेएसपीएलचे चेअरमन नवीन जिंदाल यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सुभाष चंद्रा यांच्या मीडिया ग्रुपचे पत्रकार आपल्याला कोळसा घोटाळ्याच्या बातम्यांच्या धमक्या देऊन 100 कोटींची लाच मागत आहेत असे आरोप त्यांनी लावले होते. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला. तसेच मीडिया ग्रुपचे मालक सुभाष चंद्रा यांना प्रकरणात ओढले. यानंतर दोन वरिष्ठ पत्रकारांना तुरुंगात सुद्धा डांबले होते. या घटनेच्या 6 वर्षांनंतर जिंदाल आणि चंद्रा यांनी चर्चेतून तोडगा काढला आहे.


राजकीय समिकरणे
2014 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रा यांनी कुरुक्षेत्र येथे जाऊन अप्रत्यक्षरित्या जिंदाल यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. परंतु, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. हिसार विधानसभा निवडणुकीत नवीन जिंदाल यांच्या आई सावित्री जिंदाल यांना पराभूत करण्यात चंद्रा यांची महत्वाची भूमिका होती. परंतु, आता या दोघांमध्ये समेट घडून आणल्यानंतर भाजपला कुरुक्षेत्र येथून लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही ठिकाणी आपले वर्चस्व गाजवता येईल.


दोघांनीही केले ट्वीट
मी खुश आहे, की जेएसपीएल आणि नवीन जिंदाल यांच्याकडून मीडिया ग्रुपच्या उपसंपादक आणि वरिष्ठ पत्रकारांवर लाच मागण्याचे आरोप लावण्यात आले होते. ते जिंदाल यांनी परत घेतले आहेत. नवीन जिंदाल आपल्या जीवनात चांगली कामे करतील अशी मी अपेक्षा बाळगतो.
डॉ. सुभाष चंद्रा, राज्यसभा खासदार

 

आमच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला होता, तो आता नष्ट झाला आहे. यासाठी डॉ. सुभाष चंद्रा यांना धन्यवाद म्हणतो. आता भविष्यात सुख शांती राहील.
नवीन जिंदाल, माजी खासदार


जिंदाल यांच्या विरोधात चार्जशीट
झारखंडमध्ये कोळसा खाण वाटपात झालेल्या कथित घोटाळ्यात ईडीने नवीन जिंदाल यांच्यासह 15 जणांच्या विरोधात आरोपपत्र जाखल केला आहे. यात जिंदाल यांची कंपनी जिंदाल स्टील अॅन्ड पावर लिमिटेडने इतरांसोबत मिळून स्क्रीनिंग कमिटीच्या निर्णयाला प्रभावित केले. यासाठी त्यांनी 2 कोटींहून अधिकची लाच दिली होती. असे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...