आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगड : नक्षल्यांचा आयआयडी स्फोट, गोळीबारात सहा. कमांडंटसह दोन शहीद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांकेर- छत्तीसगडच्या कांकेरमधील रावघाट भागातील किलेनार गावातील वनात बुधवारी रात्री उशिरा नक्षल्यांनी आयआयडीचा स्फोट करून सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) जवानांवर गोळीबार केला. यामध्ये बीएसएफचे सहायक कमांडंट गजेंद्रसिंह व कॉन्स्टेबल अमरेशकुमार शहीद झाले.बस्तर क्षेत्राचे आयजी विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले की, बीएसएफच्या १३४ वी तुकडी आणि जिल्हा सुरक्षा दलाचे संयुक्त पथक १० किमी आतमध्ये होती तेव्हा नक्षल्यांनी आयआयडी स्फोट करून अंधाधुंद गोळीबार केला. माहिती मिळताच कांकेरचे पोलिस अधीक्षक के.एल. ध्रुव व अन्य बीएसएफ व पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शहीद सहायक कमांडंट गजेंद्रसिंह हरियाणाचे रहिवासी होते. शहीद कॉन्स्टेबल अमरेशकुमार बिहारचे रहिवासी होते. 

बातम्या आणखी आहेत...