आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पेशल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दोन दिवसांच्या अनौपचारिक दौऱ्या आहेत. या समिटवरून उभय देशांचे संबंध मजबूत होण्याची आणि सर्व प्रश्नांची उकल होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांच्या या मधुर संबंधांसोबतच इतिहासातील एक किस्साही आठवू लागतो. जेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीत एक समिट आयोजित केली होती. त्या वेळी चीनकडे आपल्या पंतप्रधानांसाठी एकही एअरक्राफ्ट नव्हते, मग नेहरूंनी त्यांना विमान पाठवून आमंत्रित केले होते.
त्या दौऱ्याने कधी आले माधुर्य, तर कधी कटुता...
- ते वर्ष होते 1954. जेव्हा चीनचे प्रीमियर (पंतप्रधान) झाऊ एन. लाई पहिल्यांदा भारताच्या दौऱ्यात एका समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते.
- इतिहासकार डेव्हिड रेनॉल्ड्स यांच्या मते, पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीत पहिल्यांदा नेहरू-झाऊ एन. लाय समिटचे आयोजन केले होते.
- त्या वेळी चीनकडे आपल्या पंतप्रधानांसाठी विमानही नव्हते. त्यामुळे त्यांना दिल्लीला येण्यासाठी नेहरूंनी इंडियन एअरफोर्सची फ्लाइट पाठवली होती.
- झाऊ भारतात आले आणि समिटमध्ये सहभागी झाले. त्यांनी नेहरूंसोबत पंचशील करारावर स्वाक्षरीही केली, यात दोन्ही देशांच्या शांतताप्रिय अस्तित्वाचे सिद्धांत देण्यात आले होते.
पुढच्या दौऱ्यात आली कटुता
- यानंतर 1960 मध्येही एक समिट झाली, परंतु तोपर्यंत चीनचे शत्रू दलाई लामा यांनी भारतात शरण घेतलेली होती. येथूनच दोन्ही देशांमध्ये दुरावा वाढायला सुरुवात झाली.
- या समिटमध्ये सीमाप्रश्नावरून दोन्ही देशांत चर्चा झाली, परंतु कोणताही निर्णय निघाला नाही. प्रकरण सुटत नसल्याचे पाहून झाऊ यांनी पत्रकार परिषदही बोलावली.
- या पत्रकार परिषदेनंतर प्रकरण आणखीनच चिघळले. झाउ नाराज झाले आणि आपल्या डेलिगेशनसोबत इल्युशिन एअरक्राफ्टने चीनला परतले. हे एअरक्राफ्ट चीनने तेव्हा नुकतेच खरेदी केले होते.
- या घटनेनंतर दोन्ही देशांतील संबंध एवढे बिघडले की, दोन वर्षांनीच भारत आणि चीनदरम्यान युद्ध झाले.
- तथापि, मागच्या दौऱ्यांचे परिणाम कसेही असोत, परंतु मोदींच्या या चीन दौऱ्यामुळे दोन्हीही देशांना मोठी अपेक्षा आहे.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, त्या पहिल्या समिटचे काही फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.