आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावाखाली हाेते भय्यू महाराज, घरात मिळाली चारित्र्यहनन करण्याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 जूनला पत्नी डॉ. आयुषीच्या वाढदिवसालाही भय्यू महाराज काहीसे तणावात असल्याचे जाणवत होते. पोलिसांना मिळालेल्या जबाबात या बर्थडे पार्टीचा उल्लेख आहे. - Divya Marathi
8 जूनला पत्नी डॉ. आयुषीच्या वाढदिवसालाही भय्यू महाराज काहीसे तणावात असल्याचे जाणवत होते. पोलिसांना मिळालेल्या जबाबात या बर्थडे पार्टीचा उल्लेख आहे.

इंदूर -  भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती नवी माहिती आली आहे. स्वत:वर गोळी झाडून घेण्याच्या सात दिवस आधी ते खूप तणावाखाली होते. तणाव त्यांची मुलगी कुहू व दुसरी पत्नी आयुषीचाच नव्हता, तर दुसऱ्यांचाही होता. अनेक विश्वस्तांनी हळूहळू आपली पदे सोडलेली होती. उद्योजक व देणगीदारांची संख्या सातत्याने कमी होत चालली होती. एका बांधकाम व्यावसायिकाचा फोन आला की, ते अस्वस्थ होत. ही बाब त्यांच्या पत्नीच्या आई-वडिलांनी मान्य केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  त्यांची बदनामी करण्यात येईल, अशा धमक्या   त्यांना घरातच मिळत असत. 


मुलीला लंडनला पाठवण्यावरून व पत्नीशी झालेल्या मतभेदाचा ते रोज सामना करत असत. मुलीला लंडनला पाठवल्यानंतर दहा लाख रुपयांहून जास्त खर्च होत होता. घरातील लोकांचा यावर आक्षेप होता. आपली प्रतिमा डागाळण्याची त्यांना सतत भीती वाटत होती, असे पोलिसांनी सांगितले. मालमत्तेवरून वाद, विश्वस्त दूर झाले, सूर्योदय आश्रमाची आर्थिक परिस्थिती डळमळीत होत असल्याने त्यांचा तणाव वाढला होता. अशा अनेक बाबींमुळे ते मानसिकदृष्ट्या कोलमडून गेले होते.     

 

मोबाइल : आत्महत्येपूर्वी डिलीट केले मेसेज व कॉल  
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी भय्यू महाराजांनी मोबाइलमधून त्यांना आलेले अथवा पाठवलेले सर्व मेसेज, कॉल लॉग डिलीट केले होते. मोबाइल पलंगाजवळ व्यवस्थितपणे ठेवून त्यांनी जमिनीवर मांडी घालून बसल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली होती.  

 

पहिल्या आईलाच मानते : कुहू  
भय्यू महाराजांची मुलगी कुहूने म्हटले, मी माझी पहिली आई (माधवी)ला मानते. डॉ. आयुषीला आई मानत नाही. आयुषीसोबत बाबा लग्न करणार असल्याची कल्पना मला नव्हती. या लग्नासंबंधी कोणी मला सांगितले नव्हते. माझ्या आईचा दर्जा कोणी घेऊ शकत नाही. बाबांशी यामुळेच वाद झाले होते. आमच्या दोघांत लग्नानंतर बोलणे बंद होते. यापेक्षा अधिक सांगू इच्छित नाही, असे शुक्रवारी रात्री उशिरा एएसपी प्रशांत चौबे यांना दिलेल्या जबाबात सांगितले.  

 

ट्रस्ट : काही प्रमुख लोकांनी सोडली साथ  

दुसरे लग्न केल्यानंतर महाराजांची लोकप्रियता घटत चालली होती. सूर्योदय ट्रस्टशी संबंधित काही प्रमुख व्यक्तींनी हळूहळू त्यांची साथ सोडली होती. यामुळे त्यांचा कोणावरही भरवसा राहिलेला नव्हता. गरीब लोकांसाठी श्री सद््गुरू दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टच्या वतीने ज्या काही सुविधा अथवा मदत देण्यात येत होती, त्या व्यवस्थित सुरू राहतील की नाही, याची भीती त्यांना वाटत होती. महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांची संख्या कमी झाली होती.  

 

मालमत्ता : अनेक मालमत्ता विकल्या  
भय्यू महाराजांनी गेल्या सात-आठ महिन्यांत त्यांच्या अनेक मालमत्ता विकून टाकल्या होत्या. सर्व मालमत्ता विकून रक्कम मुलीला लंडनला पाठवणार होते. तेथे तिची सर्व व्यवस्था करून देणार होते. मात्र, पत्नी व सासुरवाडीच्या लोकांचा  त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप वाढला होता. सासुरवाडीचे लोक त्यांच्या घराजवळच येऊन राहू लागले होते. त्यामुळे मुलगी त्यांच्यावर नाराज होती. पत्नी व सासुरवाडीची मंडळी मुलीकडे लक्ष देत नव्हती. परंतु महाराज काय करतात? यावर मात्र त्या सर्वांची बारीक नजर होती.

 

कर्जामुळे तणावात होते भय्यू महाराज  

८ जून रोजी डॉ. आयुषीच्या वाढदिवसाला भय्यू महाराज तणावाखाली वावरत होते. काही विश्वस्तांनी साथ सोडल्याने आणि घराच्या कर्जामुळे महाराज तणावाखाली होते. आयुषीला त्यांनी नोकरी दिली होती तसेच आश्रमाचे टि्वटर हँडल करण्याची जबाबदारी त्यांनी तिच्याकडे दिली होती. त्यानंतर त्यांचे लग्न झाले होते, असे विनायक यांनी पोलिसांना सांगितले.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...