आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
होंडाने आपली प्रसिद्ध स्कूटर Activa 5G ची ऑफिशियली विक्री सुरू केली आहे. कंपनीने ती वेबसाइटवर लिस्टेड केली आहे. ही दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. यात Activa 5G DLX ची प्राइस 54,325 रुपये आणि Activa 5G STDची प्राइस 52,460 रुपये आहे. या दोन्ही किमती दिल्ली एक्स-शोरूमच्या आहेत. ही 8 रंगांत खरेदी करता येईल.
# या 8 कलर्समध्ये मिळेल..
Activa 5G ही 8 कलर्स व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यात डिझेल यलो, मॅजेस्टिक ब्राउन, मेटल एक्सिस ग्रे, ब्लॅक, मॅट स्टेलन सिल्व्हर, पर्ल अमेझिंग व्हाइट, पर्ल स्पार्टन रेड, ट्रान्स ब्लू यांचा समावेश आहे. हे सर्व मेटॅलिक कलर आहेत. सोबतच पूर्ण मेटल बॉडी आहे.
# 4-in-1 लॉक सिस्टिम
होंडा अॅक्टिव्हा 5G मध्ये रायडरच्या सुविधेसाठी 4-in-1 लॉक सिस्टिम देण्यात आली आहे. यात सीट ओपन वा लॉक करता येईल. यासोबतच या स्कूटरमध्ये मोबाइलसाठी एक पॉकेट देण्यात आली आहे.
# शॉपिंग हूक
या स्कूटरमध्ये तुम्हाला दोन शॉपिंग हूकही मिळतील. जे गाडीच्या फ्रंटमध्ये फिक्स आहेत. यासोबतच यात फोन चार्जिंगसाठी सॉकेटही मिळेल, जे याच्या पहिल्या व्हेरिएंटमध्ये आलेले आहेत.
# सेमी-डिजिटल मीटर
या स्कूटरमध्ये सेमी-डिजिटल मीटर देण्यात आले आहे. यात वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन दिसेल. एवढेच नाही, गाडीला जेव्हा सर्व्हिसिंगची गरज असेल, तेव्हा त्याची इंडिकेशनही यात दिसेल.
# मोठे फ्यूएल टँक
Activa 5G मध्ये 5.3 लीटरचे फ्युएल टँक देण्यात आले आहे. गाडीचे 60 Kmpl चे मायलेज असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच 153mm चे ग्राउंड क्लिअरन्स मिळेल. गाडीमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, Honda Activa 5G चे काही फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.