आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Newly Married Women Killed Her Husband Due To Shocking Reason Latest News And Updates

Shocking: डोकेदुखीचे औषध आणले नाही म्हणून लग्नाच्या 5व्या दिवशी नववधूनेच केला पतीचा Murder

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छपरा (बिहार) - डोकेदुखीचे औषध आणले नाही म्हणून लग्नाच्या 5व्याच दिवशी नवविवाहितेने आपल्या पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला घरातून अटक केली आहे. आरोपी सिन्की देवी (30) म्हणाली, सतत सांगूनही पती रवींद्र सिंह (35) ने दुर्लक्ष करून डोकेदुखीचे औषध आणले नाही. यावरून चिडून तिने बुधवारी पहाटे पती झोपेत असताना कुऱ्हाडीचा घाव घालून त्याचे शिर धडावेगळे केले.

 

असे आहे प्रकरण..

- घटना छपरा जिल्ह्यातील गड़खा परिसरातील आहे. रवींद्रचे लग्न 29 जून रोजी सिन्कीदेवीशी झाले होते.
- मृतक रवींद्रचा भाऊ संतोष याने भावजयीविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. भाऊ म्हणाला- घरातील सगळे सदस्य झोपले होते. पहाटे 4 वाजता ओरडण्याचा आवाज आला. घरातील सदस्यांनी तिकडे धाव घेतली तेव्हा रूमचे दार आतून बंद होते. आम्ही खिडकीतून डोकावून पाहिल्यावर ती कुऱ्हाड घेऊन भावाच्या मानेवर वार करताना दिसली. हे पाहताच आम्ही सर्वांनी मिळून दार तोडले. तोपर्यंत तिने भावाचे शिर धडावेगळे केलेले होते. विशेष म्हणजे मृत रवींद्र व सिन्कीदेवी या दोघांचेही हे तिसरे लग्न होते.

 

काय म्हणतात पोलिस?

- छपराचे डीआयजी विजय कुमार वर्मा म्हणाले, आतापर्यंत ज्या कारणांचा शोध लागला आहे, त्यापैकी डोकेदुखीचे औषध न आणल्याचे कारण कळत आहे. यामुळे महिलेने पतीवर चिडून हे कृत्य केले आहे. आरोपी महिलेला अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तथापि, हत्येमागे आणखी वेगळे काही कारण आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. अधिक तपास सुरू असून लवकरच या प्रकरणातील तथ्य समोर येतील. 

 

बातम्या आणखी आहेत...