आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Newly Wed Bride Brutally Killed By Family In Bihar Latest News And Updates In Marathi

हातावरची मेंदी अजून निघालीही नव्हती, लग्नाच्या 10 व्या दिवशीच नवविवाहितेची निर्घृण हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासाराम (बिहार) - हातावरल्या मेंदीचा रंगही निघाला नव्हता, तेवढ्यात एका नवविवाहितेची हत्या करण्यात आली. हत्येसाठी एवढी बीभत्स पद्धत वापरण्यात आली की पाहणारेच नव्हे, तर ऐकणारेही सुन्न झाले. ही घटना सासराम जिल्ह्यातील बेदा गावातील आहे. गुरुवारी रात्री उशिरा बंद घराचे दार तोडून पोलिसांनी नवविवाहितेचा मृतदेह ताब्यात घेतला. महिलेच्या गळ्यावर एका धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. यामुळे तिचे शिर जवळजवळ धडावेगळे झाले होते. मृत विवाहितेच्या वडिलांनी तिच्या पतीसहित 5 जणांवर हुंड्यासाठी हत्येची पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांनी मृत महिलेच्या मोठ्या दिराला अटक केली आहे, परंतु इतर आरोपी फरार आहेत. 

 

25 जूनला झाले होते लग्न...
- 25 जून रोजी सासाराममधील धनकढ़ा गावाच्या मनोज यादव यांच्या कन्येचे लग्न सुनीलशी झाले होते. सुनील नर्सिंग कोर्स करत आहे. त्याचे वडील ललन सिंह यांनी रेडियो स्टेशनमध्ये सुरक्षा रक्षकपदावरून निवृत्त झाल्यानंतर मुलगा जेथे नर्सिंग कोर्स करतो, त्याच्या समोरच जमीन खरेदी करून घर बांधले. याच घरात हे हत्याकांड घडले.
- ललन सिंह यांचा मोठा मुलगा आमोद त्याच घरात एक किराणा दुकान चालवतो. मधला मुलगा प्रमोद हजारीबागमध्ये नोकरी करतो.
- पूजाची हत्या बुधवारी रात्री उशिरा झाली होती.

- दीर आमोद म्हणाला, सुनील कुठल्या तरी गोष्टीवरून पत्नीची हत्या करून गुरुवारी सकाळी फरार झाला. सकाळी बराच वेळ होऊनही पती-पत्नी रूमबाहेर आले नव्हते म्हणून घरचे पाहायला गेले. पाहिल्यावर रूममध्ये सुनेचा रक्ताने माखलेला मृतदेह होता. भाऊ फरार होता. मग यानंतर घरातले सदस्यही कुलूप लावून फरार झाले. मग कुणीतरी सुनेच्या माहेरच्यांनी माहिती दिली. पोलिसांनी रात्री उशिरा 2 वाजता घराचे कुलूप तोडून खोलीतून मृतदेह बाहेर काढला.

- अवघ्या 10 दिवसांपूर्वी जिचे थाटामाटात लग्न लावले, तिचा असा मृतदेह माहेरी येईल, याची कुणी कल्पनासुद्धा केली नव्हती. या घटनेने सर्वच सुन्न झाले.

- 25 जून रोजी लग्नानंतर 29 जूनला गवना (लग्नविधी) झाला. त्याच दिवशी मुलीची पाठवणी करण्यात आली. 4 जुलैला माहेरचे मुलीच्या सासरी गेले होते. त्या दिवशी सर्वकाही ठीक होते, परंतु 24 तासांतच असे काय घडले की, मुलीची अशी निर्घृण हत्या झाली.

 

हुंडाबळीचा आरोप
- मुफस्सिल पोलिस स्टेशन इंचार्ज जगनिवास सिंह म्हणाले, मृत पूजाच्या वडिलांद्वारे सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी हत्या केल्याची तक्रार दाखल झाली आहे. हुंडाबळीशिवाय इतर अँगलनेही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फरार कुटुंबीयांच्या अटकेसाठी पोलिस पथक छापेमारी करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...