आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा- बिहारमधील राजकारणाला नजीकच्या भविष्यात नवे वळण मिळणार असून लवकरच राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होतील. रालोआ हाच आपल्यासाठी समर्थ पर्याय अाहे, असा विचार करून हे नेते सोडचिठ्ठी देतील, असा दावा भाजपचे नेते व मंत्री मंगल पांडे यांनी केला आहे.
भाजपच्या दाव्यामुळे काँग्रेस व राजदने नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा हाती घेतल्यापासून संघटनात्मक पातळीवर नाराजी आहे. बिहारमध्येही राजदच्या बाबतीच असे पाहायला मिळू लागले आहे. लालू प्रसाद यादव यांना कैद झाल्यापासून नेते पर्याय शोधू लागले आहेत. लालूंच्या कुटुंबातील नातेवाईकांवर खटले सुरू आहेत. त्यामुळे राजदमधील नेते मोठ्या संख्येने भाजपप्रणीत रालोआमध्ये प्रवेश करतील, असे पांडे यांनी सांगितले. मंगळवारी ते पत्रकारांशी बोलत होते. पांडे हे हिमाचल प्रदेशचे प्रभारी आहेत. हिमाचलमध्ये भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे. दरम्यान, भाजप अंतर्गत मोठा नाराज गट आहे. अलीकडेच महाराष्ट्रात खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनीदेखील १७ समर्थकांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली.त्यामुळे भाजपने आपले बघावे, असा टोला बिहार काँग्रेसचे अध्यक्ष कौकुब कादरी यांनी लगावला.
भाजप मूर्खांच्या नंदनवनात : राजद
भाजपने केलेला दावा ते मूर्खांच्या नंदनवनात राहत आहेत, हे दाखवून देणारा आहे. वास्तविक राजद हाच बिहारमधील सर्वाधिक पाठिंबा असलेला पक्ष आहे. पक्षाची पाळेमुळे खोलवर आहेत. लालूंना तुरुंगात चुकीच्या पद्धतीने डांबण्यात आले आहे. त्यांना अयोग्य वागणूक मिळाल्याची भावना सामान्यांमध्ये आहे, असे राजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.