आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमध्ये SC-STच्या 51 जागा, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची 26 वर आघाडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - देशात काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या अॅट्रॉसिटी अॅक्टवरील निकालानंतर मोठी निदर्शने झाली. त्यामुळे केंद्र सरकारने निकालाच्या विरोधात त्वरित सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिकाही दाखल केली होती. त्याचे एक मोठे कारण कर्नाटक निवडणूक हेही होते.

 

कारण राज्यात दलित व आदिवासी समुदायाचे सुमारे २६% मतदार आहेत. दुसरीकडे, राज्यातील भाजपचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी, घटनेत बदल व्हावा, असे वक्तव्य केले होते. त्याला राज्यात खूप विरोध झाला. राज्यात विधानसभेच्या २२४ पैकी ३६ जागा एससी आणि १५ एसटीसाठी राखीव आहेत.

 

१०० जागांवर दलित, आदिवासी समुदायाचे मतदार जास्त आहेत. ६० जागांवर दलित तर ४० जागांवर आदिवासी समुदायाच्या मतदारांचा प्रभाव आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभानिहाय जागांच्या आघाडीनुसार ३६ एससी जागांपैकी १८ वर भाजप आणि काँग्रेस १६ ठिकाणी आघाडीवर होती. एसटी जागांवर भाजप ८ तर काँग्रेस ७ जागांवर पुढे होती. आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या जागांसाठी पूर्ण ताकद लावली आहे.

 

सिद्धरामय्यांनी तीन समुदाय मिळून तयार केले ‘अहिंदा’ सूत्र

- अहिंदा हा कन्नड शब्द अल्पसंख्यातरू (अल्पसंख्याक), हिंदुलिदावरू मट्टू (मागास जाती) आणि दलितरू (दलित) यांचा शॉर्ट फॉर्म आहे. या समुदायाचे कर्नाटकात ६०% मतदार आहेत. सीएम सिद्धरामय्यांनी त्यांच्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. सिद्धरामय्याही ओबीसी आहेत. ते स्वत:लाही अहिंदा म्हणवतात.

- काँग्रेसचे सीएम सिद्धरामय्यांनी दलित, आदिवासींसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यात गरिबांसाठी मोफत धान्य, विद्यार्थ्यांना दूध, शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज यांचा समावेश आहे. निवडणुकीआधी त्यांनी एससी, एसटी समुदायासाठी २३ कोटी रु. च्या योजनाही सुरू केल्या होत्या.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कशी आहे कर्नाटकची व्‍होट बँक...

 

हेही वाचा, 
कर्नाटकात घराणेशाही: भाजप, काँग्रेस, जेडीएसच्या नेत्यांचे 52 आप्त मैदानात

 

 

बातम्या आणखी आहेत...