आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात देशातील पहिल्या इको-फ्रेंडली तेल शुद्धीकरण केंद्राची कोनशिला ठेवली. हा प्रकल्प ४३,१२९ हजार कोटी रुपयांचा आहे. हे केंद्र ४ वर्षांत तयार होणार आहे. याद्वारे राजस्थानला दरवर्षी ३४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त उत्पन्न मिळेल. २०१३ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या शुद्धीकरण केंद्राचे उद््घाटन केले होते. आता पंतप्रधान मोदी यांनी २०१८ मधील राजस्थान निवडणुकीच्या ११ महिने आधी पुन्हा कोनशिला ठेवली. या वेळी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना मोदी यांनी योजना बासनात गुंडाळल्याबद्दल मनमोहन सरकारवर निशाणा साधला. मोदी म्हणाले, मकर संक्रातीनंतर सुखकारक स्थिती येणे निश्चित आहे. आज मकर संक्रातीच्या दोन दिवसानंतर याची सुरुवात झाली आहे. राजस्थानला ऊर्जावान बनवण्याची ही सुरुवात आहे. केवळ दगड ठेवून लोकांची दिशाभूल केले जाऊ शकत नाही. काम सुरू झाल्यानंतर जनतेत विश्वास निर्माण होतो. तेल शुद्धीकरण केंद्र २०२२ मध्ये सुरू होईल.
> पहिली इको-फ्रेंडली रिफायनरी, ९० मेट्रिक टन उत्पादन
एचपीसीएल ७४% व राजस्थान सरकारचा २६% वाटा
हिंदुस्तान पेट्रोलिय व राजस्थान सरकारचा हा संयुक्त शुद्धीकरण प्रकल्प आहे. त्याचे नाव एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड आहे. यामध्ये एचपीसीएलची ७४% तर राजस्थान सरकारची २६% भागीदारी आहे. ईको- फ्रेंडली तंत्रज्ञानाचा शुद्धीकरण प्रकल्प मानक-६ दर्जाच्या पेट्रोलियम उत्पादने तयार करणारा देशातील पहिला शुद्धीकरण प्रकल्प असले. या प्रकल्पाचे वार्षिक पेट्रोकेमिकल उत्पादन क्षमता सुमारे ९० लाख मेट्रिक टन असेल.
४० हजार लोकांना अप्रत्यक्ष व १ हजारांना प्रत्यक्ष रोजगार
तेल शुद्धीकरण प्रकल्पाद्वारे राज्यात ४० हजारांहून जास्त लोकांना अप्रत्यक्ष व १ हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल. हे देशातील सर्वात आधुनिक शुद्धीकरण प्रकल्प असेल. सार्वजनिक क्षेत्रातील देशातील पहिली एकिकृत रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सही असेल. याद्वारे पेट्रोल, रबर, पेंट, प्लास्टिक उद्योगांचाही विकास होईल.
टोमणा : काँग्रेस जिथे जाते तिथे दुष्काळ पडतो
पंतप्रधान मोदी म्हणाले, राजस्थानमध्ये मी लोकांकडून ऐकले की, दुष्काळ व काँग्रेस जुळे भाऊ आहेत. जिथे काँग्रेस जाते तिथे दुष्काळ पडतो. मोठमोठ्या गप्पा मारणे,लोकांना धोका देणे काँग्रेसची कार्यशैली आहे.
बढाई : शेखावतांनी घडवला राजस्थान
मोदी म्हणाले,भैरोसिंह शेखावत यांची आठवण काढू इच्छितो. आधुनिक राजस्थानच्या निर्मिती शेखावत यांना नमन करतो. जसवंत सिंह यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सर्वांना प्रार्थना करायला हवी.
तयारी : ५ महिन्यांमध्ये ५८,००० कोटींचे प्रकल्प
मोदींनी राज्यात पाच महिन्यांत एकूण ५८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात उदयपूरमध्ये १.४ किमी लांब झुलता पूलसह १५००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.