आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापानिपत- पानिपतची तिसरी लढाई १८ व्या शतकातील मोठी लढाई होती. या इतिहासावर आशुतोष गोवारीकर “पानिपत द ग्रेट बॅटल’ चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मराठा वंशजांना अभिमान वाटतो.
पानिपतचा जो इतिहास सरकार विसरली आहे. तरुणांनाही याबद्दल फारशी माहिती नाही. चित्रपटातून हा इतिहास पुन्हा जिवंत केला जाऊ शकतो. हा खूप चांगला प्रयत्न आहे. मात्र, इतिहासाशी काही छेडछाड केल्यास ते सहन केले जाणार नाही, असे या वंशजांचे म्हणणे आहे. पानिपत ट्रस्टचे उपाध्यक्ष रमेश पुहाल म्हणाले, गोवारीकर इतिहासाची मोडतोड करून चित्रपट बनवू शकतात.
अनेक महिन्यांपासून सुरू होता अभ्यास
या विषयावर चित्रपट निर्मिती करण्यापूर्वी आशुतोष व त्यांच्या पथकाने गेल्या काही महिन्यांपासून अभ्यास सुरू केला होता. गोवारीकरांचे पथक पानिपतमधील विविध स्थळांना भेटी देत होते. येथील मराठा वंशजांशी त्यांनी संपर्क साधला. त्यांच्याकडून ऐतिहासिक पुरावे गोळा केले. येथे असलेल्या काला अम्बपासून संग्रहालयातील तिसऱ्या लढाईच्या अवशेषांचा खोलवर अभ्यास केला. अभ्यासाचे काम पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटातील स्टारकास्टची माहिती सार्वजनिक केली. यासंदर्भात पहिले पोस्टर नुकतेच जारी करण्यात आले आहे.
> यावर राहील फोकस
लढाईचा इतिहास
पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या इतिहासावर हा चित्रपट बेतलेला आहे. १४ जानेवारी १७६१ रोजी अफगाण आक्रमणकारी अहमदशाह अब्दाली अाणि मराठ्यांत लढाई झाली. सेनापती सदाशिवराव भाऊ यांचा अहमदशाह अब्दालीने पराभव केला. या लढाईची दोन कारणे हाेती, यात पहिले कारण नादिरशहाला अब्दालीप्रमाणेच भारतात लूट करायची होती. दुसरे, मराठे “हिंदूपदपातशाही’च्या इराद्याने पेटलेले होतेे. दिल्लीवर त्यांना कब्जा करायचा होता.
सदाशिवराव यांचे खासगी आयुष्य
या चित्रपटात लढाईचे प्रसंग नव्हे, तर सदाशिवराव भाऊ यांचे खासगी आयुष्य चितारण्यात आलेे आहे. सदाशिवराव भाऊ यांची दुसरी पत्नी पार्वतीबाई यांच्यावर सर्व फोकस असेल. त्यांच्या पहिल्या पत्नी उमाबाई यांचे निधन झालेले होते. पार्वतीबाईंनी शेवटच्या लढाईपर्यंत त्यांना साथ दिली होती.
चित्रपटाचे कथासार
पानिपतची काही स्थळे व गावे यात दिसतील. मराठ्यांचे सैन्य पानिपतजवळील भादड गावात येऊन थांबले होते. सदाशिवराव भाऊ यांचा तंबू इसरानाजवळील एका मोकळ्या जागेत टाकण्यात आला होता. येथेच भाऊपूर नावाचे गाव नंतर वसवले गेले. भादड गाव युद्धाची प्रमुख भूमी होते. विश्वासराव मारले गेल्यानंतर सदाशिवराव भाऊ हत्तीवरून खाली उतरतात. तेव्हा सैन्याला वाटते, तेही मारले गेले. यामुळे सैन्याचे मनोधैर्य खचते आणि सैन्य सैरावैरा धावत सुटते. यामुळे येथे भादड गाव वसले. मराठ्यांनी येथे प्रगटेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली होती. हे मंदिर अाजही तेथेच आहे. येथे एक झाड लावण्यात आले होते. याच मंदिराच्या धर्तीवर त्यांनी देवीचे मंदिर बांधले. मराठ्यांचे ऐतिहासिक स्थळ उग्राखेडी गावात काला अम्ब मंदिर आहे.
अशी आहेत पात्रे
सदाशिवराव भाऊ यांना भाऊसाहेबही म्हटले जात होते. चित्रपटात त्यांची भूमिका अर्जुन कपूर साकारणार आहे. अहमदशाह अब्दाली दुर्राणी नावानेही ओळखला जातो. त्याच्या भूमिकेत संजय दत्त आहे. अब्दाली कवी होता. यामुळे संजय दत्त कविता सादर करताना दिसेल. सदाशिवराव भाऊ यांचे खासगी आयुष्य या चित्रपटात दिसेल.
बाजीराव-मस्तानीशी लिंक
या चित्रपटाचा संबंध बाजीराव-मस्तानी चित्रपटाशी आहे. सदाशिवराव हे बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांचे सुपुत्र होते. संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव पेशव्यांवर चित्रपट काढला होता. यात बाजीरावांची भूमिका रणवीरसिंह व मस्तानीच्या भूमिकेत दीपिका पदुकाेण होती, तर काशीबाईंची भूमिका प्रियंका चोप्रा हिने साकारली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.