आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुलचे मोगलधाम मंदिरात दर्शन, पुजाऱ्याने सोनियाच्या तब्येतीबाबत विचारले तर फोन लावून दिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी अहमदाबादच्या मोगलधाम-बावला मंदिरात पोहोचले आणि याठिकाणी त्यांनी दर्शन घेतले. यादरम्यान पुजाऱ्याने त्यांच्याकडे सोनिया गांधींच्या तब्येतीबाबत विचारणा केली. तसेच सोनिया लवकर बऱ्या व्हाव्या म्हणून पुजा करत राहुल यांना एक चुनरी आणि प्रसाद दिला. राहुल यांनी यावेळी पुजाऱ्यांचे फोनवर सोनियांशी बोलणे करून दिले. गुजरात निवडणुकीत राहुल गांधींनी आतापर्यंत सुमारे 25 मंदिरांत दर्शन घेतले आहे. शनिवारी गुजरात विधासनभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला आणि निकाल 18 डिसेंबरला लागतील. 


चुनरी आईला तर प्रसाद बहिणीला देणार : राहुल
राहुल गांधींच्या पुडेच्या वेळी पुजारी सरदार सिंह परमार यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना केली. त्यावर राहुल यांनी विचारले की, सोनियांशी बोलणार का. पुजारी काही बोलण्या आधीच राहुलने सोनियांना फोन लावला आणि म्हणाले, आई पुजारीजींशी बोल.. राहुल म्हणाले की, प्रसादात मिळालेली चुनरी आईला तर प्रसाद बहिणीला देणार आहे. 


द्वारकामधून राहुल गांधींनी सुरू केली होती नवसर्जन यात्रा 
गुजरात निवडणूक प्रचारात राहुल गांधींनी आतापर्यंत 22 मंदिरांमध्ये डोके टेकवले आहे. गेल्यावेळी राहुल गांधी सोमनाथ मंदिरात गेले होते. यापूर्वी गुजरातच्या सर्व प्रसिद्ध मंदिरात जाऊन त्यांनी पुजा केली आहे. नरेंद्र मोदींनी भुजमध्ये आशापुरा मातेचे दर्शन घेतले. त्याच ठिकाणाहून त्यांनी नवसर्जन यात्रा सुरू केली होती. 


या मंदिरांमध्ये गेले होते राहुल गांधी 
द्वारकाधीश, कागवडमधील खोडलधाम, नाडियाडमधील संतराम मंदिर, पावागज महाकाली, नवसारीमधील ऊनाई माता मंदिर, अक्षरधाम मंदिर, बहुचराजी मंदिर, कबीर मंदिर, चोटिला देवी मंदिर, दासी जीवन मंदिर, राजकोटचे जलाराम मंदिर, वलसाडमधील कृष्ण मंदिर याशिवाय त्यांनी काँग्रेसच्या नवसर्जन यात्रेत इतरही लहान मोठ्या मंदिरांत दर्शन घेतले. 

 

पुढे पाहा, संबंधित PHOTOS

बातम्या आणखी आहेत...