Home | National | Other State | news about Victim Family And Key Witnesses in asaram rape case

समेटासाठी धमकी, लाचही देऊ केली, 4 साक्षीदार मारले गेले; तरीही पीडित कुटुंबाचे खचले नाही धैर्य

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 26, 2018, 07:08 AM IST

आसारामला जन्मठेपेची शिक्षा मिळाल्याने पीडितेने समाधान व्यक्त केले आहे. बुधवारी निकाल आल्यावर मुलगी म्हणाली की,

 • news about Victim Family And Key Witnesses in asaram rape case

  शाहजहांपूर - आसारामला जन्मठेपेची शिक्षा मिळाल्याने पीडितेने समाधान व्यक्त केले आहे. बुधवारी निकाल आल्यावर मुलगी म्हणाली की, आणखी दोन लोकांना शिक्षा झाली असती तर चांगले झाले असते. पीडितेचे वडील म्हणाले की, आम्हाला साथ दिल्याबद्दल न्यायपालिका, माध्यमांना धन्यवाद. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले नसते तर आसारामने आम्हालाही मारले असते आणि कोणाला पत्ताही लागला नसता.

  जुन्या गोष्टींची आठवण नको म्हणून मुलगी माध्यमांसमोर येत नाही. या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची आमची इच्छा आहे. ज्यांची हत्या केली गेली त्यांनाही न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. आसारामच्या गुंडांनी अनेकदा समझोत्यासाठी दबाव टाकला होता. मला मोडून काढण्याचे प्रयत्न करण्यात आलaे. अनेक साक्षीदारांची हत्याही केली. पीडितेचा भाऊ म्हणाला की, खटला लढताना अनेक अडचणी आल्या. भीती वाटत असे. आम्हाला या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची इच्छा होती. माझे शिक्षणही थांबले. बहिणीचेही शिक्षण थांबले.

  बाबाला ज्यांनी पकडले : आयपीएस लांबांना १६०० पत्रांद्वारे हत्येची धमकी

  आसारामला शिक्षा देण्यात आयपीएस अजयपाल लांबांची भूमिका महत्त्वाची ठरली. २१ ऑगस्ट २०१३ ला दिल्ली पोलिसांचे पथक एका अल्पवयीन मुलीसोबत लांबांना भेटण्यास आले. लांबा तेव्हा जोधपूर पश्चिमचे उपायुक्त होते. सध्या अँटिकरप्शन ब्युरोत तैनात आहेत. लांबा म्हणाले की, आधी माझा विश्वासच बसला नाही. मग मुलीने मला आसारामच्या मणई गावातील ज्या आश्रमात तिचे शोषण झाले त्या आश्रमाचा नकाशा काढून दाखवला. पण आम्हाला आसारामचा पत्ता माहीत नव्हता.


  मी पथकाला इंदूर आश्रमात पाठवले. जोधपूरमध्ये पत्रपरिषद घेतली. त्यावर आसाराम इंदूर आश्रमात आला आणि पथकाने त्याला अटक केली. त्यानंतर मला १६०० पत्रे मिळाली. त्यात ठार मारण्याची धमकी होती. लाचेचा प्रस्तावही होता.

  आरोपपत्र : भुताची छाया सांगून, शिक्षक बनवण्याचे आश्वासन देऊन बोलावले होते

  पीडितेचे आरोपपत्रातील वक्तव्य अत्यंत वेदनादायी होते. ६ ऑगस्ट २०१३ ची गोष्ट. आसारामच्या गुरुकुलमध्ये शिकलेल्या पीडितेची तब्येत बिघडली. बाबाची साधक शिल्पीने पीडितेला सांगितले की, तिच्यावर भुताची छाया आहे. बापूच ती दूर करतील. १४ ऑगस्टला मुलीला आश्रमात नेले.

  आसाराम : तुझे भूत काढून टाकू. कोणत्या वर्गात शिकते?
  पीडित मुलगी : बापू, मला सीए करायचे आहे.
  आसाराम : सीए करून काय करशील, अधिकारी माझ्या पायात पडलेले असतात. तू बीएड करून शिक्षिका हो. तुला आपल्या गुरुकुलमध्ये शिक्षिका करीन. नंतर प्राचार्य करीन. तुझ्यावर भुताची छाया आहे. तू रात्री ये. तुझे भूत उतरवीन.
  पीडिता मुलगी : ठीक आहे बापू. त्यानंतर पीडिता गेली. १५ व १६ ऑगस्ट २०१३ च्या रात्री तिला कुटीत बोलावले. स्वयंपाकी एक ग्लास दूध घेऊन आला. त्यानंतर मुलीवर अत्याचार केला.

  साक्षीदारांचा मृत्यू : १० पैकी ३ हत्या, १ बेपत्ता

  - आसाराम प्रकरणात १० साक्षीदारांवर हल्ला झाला आहे. त्यापैकी तिघांची हत्या झाली . एक बेपत्ता आहे. मृतांत अमृत प्रजापती, अखिल गुप्ता, महेंद्र चावलांचा समावेश आहे. आणखी एक साक्षीदार राहुल सचान बेपत्ता आहे.
  - आसाराम खटल्याची सुनावणी १४७० दिवस चालली. आतापर्यंत १२ वेळा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याची बाजू देशातील १४ मोठे वकील मांडत होते. त्यात राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामींचा समावेश आहे.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, १० तासांत १० मिनिटांसाठी घराबाहेर आले पीडितेचे वडील; ३ ठाण्यांचे पोलिस सुरक्षेसाठी तैनात...

 • news about Victim Family And Key Witnesses in asaram rape case

  १० तासांत १० मिनिटांसाठी घराबाहेर आले पीडितेचे वडील; ३ ठाण्यांचे पोलिस सुरक्षेसाठी तैनात  
  यूपीच्या शाहजहांपूरमध्ये बुधवारी पीडित कुटुंबाच्या घरासमोर सकाळीच न्यूज चॅनलच्या ओबी व्हॅन आणि माध्यम प्रतिनिधींची गर्दी होती. घराबाहेर ३ ठाण्यांचे पोलिस होते. सकाळी साडेदहा वाजता जोधपूर कोर्टाने आसारामला दोषी ठरवल्यानंतर १० मिनिटांनी पीडितेचे वडील ५ मिनिटे घराबाहेर आले आणि आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता शिक्षा जाहीर झाल्यानंतर पुन्हा ५ मिनिटे बाहेर आले. पण मुलगी माध्यमांसमोर आली नाही.  

 • news about Victim Family And Key Witnesses in asaram rape case

  अत्याचारी आसारामचे साम्राज्य

  - संपत्ती:१० हजार कोटी, १९ देशांत ४०० आश्रम  

  आसारामचा जन्म पाकिस्तानच्या सिंध प्रांतात १९४१ मध्ये झाला. फाळणीनंतर कुटुंब गुजरातला आले. लीलाशाह हे आसारामचे आध्यात्मिक गुरू होते. त्यांनीच असुमलचे नाव आसाराम ठेवले. आसारामचे १९ देशांत ४०० आश्रम आहेत. अटकेआधी त्याच्या भक्तांची संख्या ४ कोटी होती. सुमारे १० हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याची पडताळणी सध्या कर विभाग, ईडी करत आहे.  

   

  प्रभाव:अटल, गहलोत, मोदी आशीर्वाद घेत 

  राजकीयदृष्ट्याही आसाराम प्रभावी होता. भाजप असो की काँग्रेस, आसारामचे शिष्य असलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गुजरातचे तत्कालीन सीएम नरेंद्र मोदी, अशोक गहलोत, वसुंधरा राजे, रमणसिंह, दिग्विजयसिंह, शिवराजसिंह चौहान, फारुख अब्दुल्ला, लालकृष्ण अडवाणी हे आसारामच्या मंचावर आशीर्वाद घेण्यासाठी जात होते. 

   

   

Trending