आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये स्पर्धा असायला हवी, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - नरेंद्र मोदींनी बुधवारी लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये 'युपी इनव्हेस्टर्स समिट-2018' (UPIS)चे उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेश संपूर्ण देशाच्या विकासाचे इंजिन बनू शकते. येथे नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरचा नाही. आधीच्या आणि सध्याच्या परिस्थितीतही फरक आहे. योगी आदित्यनाथ येथे बदल घडवून आणत आहेत. मोदींनी सांगितले की, आम्ही बजेटमध्ये देशात दोन डिफन्स इंडस्ट्रियल कॉरिडोर बनवल्याचा उल्लेख केला होता. त्यापैकी एक युपीमध्ये असेल. त्यातून 2.5 लाख रोजगार निर्मिती होईल. या समिटमध्ये मुकेश अंबानी, गौतम अडाणीसह अनेक उद्योगपती सहभागी झाले आहेत. आतापर्यंत 1045 MOU वर सह्या झाल्या असून 4 लाख 28 हजार कोटींची गुंतवणूक यातून होणार आहे. 


यूपी आणि महाराष्ट्रात स्पर्धा व्हावी
यावेळी मोदी म्हणाले, महाराष्ट्र सरकारने अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरमध्ये बदलण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. युपी यामध्ये महाराष्ट्राला टक्कर देऊ शकते का. दोघांमध्ये आधी कोण ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल यासाठी स्पर्धा व्हावी असे मला वाटते. 


मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे..
>> उत्तर प्रदेशातील निराशेचे वातावरण बदलत असल्याचे मोदी म्हणाले. त्यासाठी त्यांनी योगी सरकारला शुभेच्छाही दिल्या. 
>> अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही युपीतील लोक ज्या पद्धतीने पुढे जातात त्यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. 
>> योगी सरकार लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कसोशीने काम करत आहे. 

 

काय म्हणाले अंबानी..

मुकेश अंबानी यांनी उत्तर प्रदेशात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले आहे. जियो उत्तरप्रदेशात 20 हजार कोटींची गुंतवणूक करेल असे अंबानींनी सांगितले. 2018 च्या अखेरीपर्यंत जियो उत्तर प्रदेशातील प्रत्येक गावात पोहोचेल असे अंबानी यावेळी म्हणाले. अंबानींनी युपीचे मुख्यमंत्री योगींचे गुणगानही गायले. योगी हे कर्मयोगी असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, समिटचे काही PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...