आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल, हार्दिकसह मोदीं यांच्या राेड शाेला मनाई , दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा वेग वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी भाजप आणि काँग्रेसनेही चांगलाच जोर लावला आहे. नरेंद्र मोदींची सोमवारी पाटण, नडियाड आणि अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंटवर, तर राहुल गांधी विरमगाम, मुवाल आणि गांधीनगरमध्ये एकूण ४ सभा झाल्या. सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवारी मोदी आणि राहुल यांचा रोड शो रद्द करण्यात आला आहे. 


रोड शोला मनाई

अहमदाबादचे पोलिस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी सांगितले की, भाजप - काँग्रेसने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोसाठी परवानगी मागितली होती. पण सुरक्षेसह कायदा आणि सुव्यवस्था तसेच लोकांना होणारा त्रास विचारात घेता रोड शोला परवानगी नाकारण्यात आली आहे. 


काँग्रेसवर हल्ला

पालनपूरच्या रॅलीमध्ये मोदींनी मणिशंकर अय्यरवर तिसऱ्यांदा हल्लाबोल केला. पाकिस्तानात गुप्तचर यंत्रणेत मोठ्या पदावर राहणारे लोक, अहमद पटेल यांनी मुख्यमंत्री बनावे अशी इच्छा का व्यक्त करत आहेत. वडोदरामध्ये नरेंद्र मोदींनी आरोप केला की, लष्कराने मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेपलीकडे सर्जिकल स्ट्राइकची परवानगी मागितली होती. पण तेव्हा काँग्रेस सरकारने परवानगी दिली नाही. लष्कराच्या एका मोठ्या अधिकाऱ्यांनीच याबाबत माहिती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. मनमोहनसिंग सर्जिकल स्ट्राइकची परवानगी द्यायची हिंमत दाखवू शकले नाहीत. 

 

मोदीजींसाठी गोड-गोड बोला.. 

रविवारीच राहुल गांधींनी गुजरातच्या डाकोरमध्ये म्हटले, मोदीजी पंतप्रधान आहे. त्यांच्याविरोधात चुकीच्या शब्दांचा वापर करू नका. आपण काँग्रेसी आहोत. प्रेमाने बोला. चांगल्या शब्दांचा वापर करा, गोड बोला आणि त्यांना पळवून लावा. 

 

बातम्या आणखी आहेत...