आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटावा व बुलंद शहरातील तुरुंगात आढळले एड्सचे नऊ रुग्ण कैदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटावा / बुलंद शहर- उत्तर प्रदेशातील गोरखपूर, मेरठ आणि गाझियाबाद येथील तुरुंगात एड्सचा रुग्ण कैदी आढळल्यानंतर आता इटावा व बुलंद शहरात नऊ कैद्यांना या रोगाने ग्रासले असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.  


तुरुंगाधिकारी मुकेश कटियार यांनी शनिवारी सांगितले, तुरुंगात झालेल्या कैद्यांच्या आरोग्य तपासणीत नऊ कैद्यांना एड्स झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर सैफई अँटिरेटोरल व्हायरल थेरपीद्वारे सैफई वैद्यकीय महाविद्यालयातील एआरटी सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तुरुंगात असलेल्या एड्स रुग्णात सहा विचाराधीन तसेच  शिक्षा भाेगत असलेल्या दोन कैद्यांचा समावेश आहे.  


तुरुंगात दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढते आहे. तसे पाहू जाता तुरुंगात एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या कैद्यांची संख्या १७ होती. परंतु या आजाराने ग्रासलेल्या ९ कैद्यांची सुटका झाली आहे. आणखी ९ कैदी तुरुंगात आहेत. बुलंद शहरातील तुरुंग अधीक्षक ओ. पी. कटारिया यांनी सांगितले, वैद्यकीय तपासणीदरम्यान  पाच कैद्यांचा एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

बातम्या आणखी आहेत...