आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • लखनऊ आग्रा एक्स्प्रेस वेवर 9 विद्यार्थ्यांना बसने चिरडले; 7 जण ठार, 3 जण जखमी Nine Students Run Over By A Bus On Agra Lucknow Expressway Near Kannauj

लखनऊ- आग्रा एक्स्प्रेस वेवर 9 विद्यार्थ्यांना बसने चिरडले; 7 जण ठार, 3 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> एका बसमधून दुसऱ्या बसमध्ये डिझेल टाकत असताना झाला अपघात.

> मुख्यमंत्री योगींनी दिले चौकशीचे आदेश.

 

कन्नौज - लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना झाली. भरधाव रोडवेज बसने 9 विद्यार्थ्यांना चिरडले. या भीषण अपघातात 7 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी आहेत. सूत्रांनुसार, विद्यार्थी हरिद्वारला सहलीसाठी जात होते. घटनेनंतर बस ड्रायव्हर फरार झाला. आसपासच्या लोकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

 

केव्हा झाला अपघात?
- कन्नौज जिल्ह्यातील तिर्वा गावाजवळ आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर सोमवार पहाटे 4 वाजता हा अपघात झाला. 

 

हरिद्वारला शैक्षणिक सहलीवर हे विद्यार्थी जात होते.
- संतकबीरनगरच्या प्रेमादेवी माध्यमिक कालेजचे तब्बल 550 विद्यार्थी हरिद्वारला शैक्षणिक सहलीवर जात होते. 
- सोमवारी पहाटे 4 वाजता काही बसेसमधील डिझेल संपले. एक्सप्रेस-वेवर तिर्वा परिसरात सर्व बसेस रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आल्या होत्या. यादरम्यान काही विद्यार्थी एका बसमधून दुसऱ्या बसमध्ये डिझेल भरत होते. तेवढ्यात पाठीमागून येत असलेली रोडवेजची बस अनियंत्रित झाली आणि हायवेवर उभ्या 9 विद्यार्थ्यांना चिरडून गेली. अपघातात 6 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

- 10 ते 12 बसेसमधून हे विद्यार्थी हरिद्वारला जात होते.

 

योगी आदित्यनाथ यांनी दिले चौकशीचे आदेश
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातप्रकरणी जिला प्रशासनला एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने मृतांच्या नातेवाइकांसाठी 2-2 लाख रुपये आणि जखमींसाठी 50-50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

मृतांची नावे
(1) महेश गुप्ता, संत कबीरनगर. 
(2) विजय, हजरा खलीलाबाद संतकबीरनगर. 
(3) मिथलेस, डकसरा संतकबीर नगर. 
(4) विशाल, शाहजनवा गोरखपुर. 
(5) अभय प्रताप, लवाईनगर, खलीलाबाद, संतकबीरनगर. 
(6) सतीश, शकुलीन नाथनगर संतकबीरनगर.
(7) जितेंद्र कुमार यादव, चकिया भीटी रावत गोरखपुर.

जखमींची नावे
(1) प्रमोद कुमार, हरियावां मैदावाल बस्ती संतकबीरनगर. 
(2) चिंतामणि, जुगाई संतकबीरनगर.  

बातम्या आणखी आहेत...