आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • धक्कादायक: 9 वर्षांच्या बालिकेला बाइकवरून उचलून घेऊन गेला बदमाश Nine Year Old Was Kidnaped Up On A Bike

9 वर्षांच्या मुलीला बळजबरी बाइकवरून नेत होता नराधम, चिमुरडीच्या धाडसामुळे टळला अनर्थ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - देशभरात लहान मुलींवर होत असलेल्या गैरकृत्यांदरम्यान जयपुरात गुरुवारी एक मोठा अनर्थ टळला. वर्दळीच्या गोपाळपुरा बायपासवर मूर्तिकला कॉलनीच्या जवळ गुरुवारी सकाळी 6.38 वाजता 9 वर्षीय बालिकेला बाइकस्वार बदमाश उचलून घेऊन गेला. चिमुकली ओरडली तेव्हा लोखंडी वस्तूने त्याने तिच्या छातीवर प्रहार केला. तरीही न डगमगता चिमुरडीने विरोध सुरूच ठेवला. या गोंधळात नराधमाची बाइक बंद पडली आणि हीच वेळ साधून चिमुरडीने उडी मारून घराकडे धाव घेतली. 

 

घटना चकित करणारी...

रण घरापासून फक्त 50 मीटर अंतरावर डेअरीतून दूध घेऊन परतत होती बालिका. तेवढ्यात झाला अपहरणाचा प्रयत्न.
झोप उडवणारी...

कारण घटना गोपाळपुरा बायपाससारख्या वर्दळीच्या मार्गावर झाली. जवळची पोलिस चौकी फक्त 100 मीटर अंतरवर. 

भीतिदायक...

कारण घराघरांत मुली आहेत. त्यांचे अवघे जग म्हणजे गल्ली, कॉलनी, शाळा आणि घरच असते. मग आता त्या कुठेच सुरक्षित नाहीत का?

> ही घटना चिमुरडीच्या हिमतीमुळे टळली. आता पोलिस त्या नराधमाचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही कॅमऱ्यात तो काळ्या रंगाच्या बाइकवर दिसला आहे. 

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
> घटना बुधवारी सकाळी 6.38 वाजेची आहे. गोपाळपुरा बायपास मूर्तिकला येथील रहिवासी चिमुरडी घरापासून 50 मीटर अंतरावरील दुकानातून दूध आणण्यासाठी गेली होती. घरी परत येताना बाइकस्वार तरुण आला आणि मुलीला पत्ता विचारायच्या बहाण्याने थांबवून बळजबरी बाइकवर पुढे बसवले. तिथून बदमाश मुलीला तब्बल 200 मीटर अंतरावरील एका खासगी शाळेपर्यंत घेऊन गेला. यादरम्यान बालिका ओरडली आणि विरोध करू लागली. बाइकस्वार तरुणाने एका लोखंडी गोल वस्तूने तिच्या छातीवर प्रहार केला. परंतु मुलीने न डगमगता विरोध सुरूच ठेवला. शेवटी बाइकचे संतुलन बिघडले व ती बंद पडली. हीच वेळ साधून चिमुरडीने बाइकवरून उडी मारली आणि वेगाने घराकडे धाव घेतली. आरोपी तरुणही बाइकवरून मागे-मागे आला. पण नंतर त्याने पळ काढला. मुलीने घरी जाऊन आपल्या वडिलांना आपबीती ऐकवली. यानंतर कुटुंबीय व आसपासच्या लोकांनी बाइकस्वार तरुणाचा शोध घेतला, परंतु तो आढळला नाही.

> यानंतर सकाळी 7.30 वाजता कुटुंबीय मुलीला सोबत घेऊन बजाजनगर पोलिसांत पोहोचले. अपहरणाचा प्रयत्न झाल्याची सूचना मिळाल्यावर पोलिस आयुक्तालयात खळबळ उडाली. डीसीपी ईस्ट कुंवर राष्ट्रदीप पोलिस स्टेशनला पोहोचले. अॅडिशनल डीसीपी हनुमान प्रसाद मीणा आणि ट्रेनी आयपीएस कावेन्द्र कुमार सागर यांनी घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग खंगाळली. मूर्तिकला कॉलनीतील कोचिंग क्लासेसवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झाला. मुलीने सांगितले की, अंकल सावळ्या रंगाचा होता आणि चष्मा लावलेला होता. आरोपीकडे एक बॅगही होती. पोलिसांनी पीड़ित बालिकेच्या वडिलांच्या तक्रारीवरून प्रकरण दाखल करून मुलीचे मेडिकल केले असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या धक्कादायक घटनेचे आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...