आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PNB घोटाळा: 11 हजार कोटींचा फ्रॉड करणारा आरोपी जगतो अशी Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीरव मोदीने दोन वर्षांपूर्वी त्याच्या ब्रँडला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उम्मेद भवन येथे शाही सोहळा आयोजित केला होता. - Divya Marathi
नीरव मोदीने दोन वर्षांपूर्वी त्याच्या ब्रँडला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उम्मेद भवन येथे शाही सोहळा आयोजित केला होता.

जोधपूर - डायमंड बिझनसमुळे संपूर्ण जगात चमकणारा नीरव मोदी सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. झगमगत्या जगातील तारे-तारकांसोबतच्या पार्टीज् आणि श्रीमंत लोकांमध्ये उठबस करण्याची नीरव मोदीला आवड आहे. दोन वर्षांपूर्वी नीरव जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये आला होता. यावेळी त्याने त्याच्या हिऱ्यांच्या चकाकीने सर्वांना दिपवून टाकले होते. नीरव मोदी ब्रँडला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याने येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये जोधपूरच्या अनेक बड्या हस्तींनी सहभाग नोंदवला होता. 

 

उम्मेद भवनमध्ये होती नीरवचा झगमगाट  
- दोन वर्षांपूर्वी नीरव मोदी जोधपूरमध्ये आला होता. तेव्हा त्याच्या 'नीरव मोदी' ब्रँडला पाच वर्षे पूर्ण झाली होती. यानिमित्ताने शाही थाटातील सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी देशातील निवडक हस्तींना निमंत्रित करण्यात आले होते. नीरवसाठी उम्मेद भवन विशेष सजवण्यात आले होते. 
- दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात जोधपूरचे माजी महाराज गजसिंह यांची विशेष उपस्थिती होती. त्याशिवाय फॅशन डिझायनर राघवेंद्र, कविता राठोड, मनीष मल्होत्रा, योहानन, मिशेल पूनावाला, इशिता, राज आणि दीप्ति साळगावंकर, चिराग व तनाज जोशी, लिजा हेडन, निखिल व इलीना मेशवानीसह अनेक बडे स्टार्स आणि प्रसिद्ध महिला मॉडेल्स उपस्थित होत्या. 

 

का आहे चर्चेत
- नीरव मोदी हा हिरे व्यापारी आहे. त्याचा नीरव मोदी हा हिऱ्यांचा ब्रँड आहे. त्याच्यावर आरोप आहे की त्याने व त्याच्या कंपनीने पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील एका शाखेला 11,356 कोटींचा गंडा घातला आहे. 
- बँकिंग क्षेत्रातील हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटले जात आहे. या घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर मोदी कुटुंबियांसह फरार आहे. तो विदेशात पळून गेल्याचे म्हटले जाते.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, नीरव मोदी उम्मेद भवनमध्ये भेटला या दिग्गजांना...

बातम्या आणखी आहेत...