आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पूर्वोत्तर राज्यात पूराचे थैमान Northeast Flood Improvement Assam Situation Still Grim

पूर्वोत्तरमध्ये पूराचे 23 बळी, आसाममध्ये जनजीवन विस्कळीत; मणिपूर, त्रिपुरात परिस्थिती नियंत्रणात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाममध्ये अद्याप पुर ओसरलेला नाही. येथे सात नद्यांनी एक - दोन ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. - Divya Marathi
आसाममध्ये अद्याप पुर ओसरलेला नाही. येथे सात नद्यांनी एक - दोन ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

गुवाहाटी - पूर्वोत्तरभागात आलेल्या पूराने गेल्या दोन दिवसांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये पाच तर मणिपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुसळधार पावसाच्या बळींची संख्या यामुळे 23वर पोहोचली आहे. आसाममधील परिस्थिती चिंताजनक आहे. येथील सहा जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, पूर्वोत्तरच्या काही भागात रविवारी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे की सोमवारी पश्चिमी उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागासह उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

 

7 नद्या धोक्याच्या पातळीवर 
- आसामच्या जोरहट येथे निमाती घाटावर, ब्रह्मपुत्र आणि काछर जिल्ह्यात एपी घाटावर, तसेच करीमगंजमध्ये बद्रपुरघाटावर बराक नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याशिवाय धनसिरी, जिया भराली, कोपिली, काटाखाल आणि कुशियारा या नद्यांनीही काही ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

 

मणिपूरमध्ये दोन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी 
- मणिूपरच्या इंफाळ घाटीच्या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या नद्यांची पाणीपातळी कमी झाली आहे. येथे फक्त लयोंग आणि इंफाळ नदीनेच धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरनियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आता परिस्थिती सुधारली आहे. 

 

त्रिपुरामध्ये 32 हजार लोक विस्थापित 
- त्रिपुरामध्ये रविवारी परिस्थिती थोडी साधारली आहे. राज्यातील अनेक मोठ्या नद्यांची पाणी पातळी खालावली आहे. असे असले तरी कैलाशनगर येथील अनेक भागात अद्याप पाणी भरलेले आहे. येथे 3 हजार शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने ते चिंतेत आहेत. 
- राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 173  शिबिर सुरु केले असून तिथे 32 हजार पूरग्रस्तांना आश्रय देण्यात आला आहे. यातील सर्वाधिक ऊनाकोटी जिल्ह्यातील नागरिक आहेत. 
- मिझोराममध्येही पुराने मोठे नुकसान झाले आहे. उत्तरी मिझोराममधील 25 गावांची राज्यातील इतर भागाशी संपर्क तुटला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...