आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • आता कोण सांभाळणार आसारामचे अब्जावधींचे साम्राज्य, समोर आली 2 नावे Now These People Will Take Over Asarams Empire Of Billions

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता कोण सांभाळणार आसारामचे अब्जावधींचे साम्राज्य, समोर आली ही 2 नावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अासारामची मुलगी भारती. - Divya Marathi
अासारामची मुलगी भारती.

अहमदाबाद - आसाराम ऊर्फ आसुमल थाऊमल हरपलाणी याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न हाच उभा राहिलाय की, त्याची अमाप संपत्ती कोण सांभाळणार? ही संपत्ती फक्त भारतच नाही, तर इतर देशांतही आहे. त्याचा मुलगाही बलात्काराच्या प्रकरणात सुरतच्या जेलमध्ये कैद आहे. यामुळे सर्व हेच मानत आहेत की, आसारामचे दोन विश्वासू असे आहेत जे त्याच्या अनुपस्थितीत त्याचे साम्राज्य सांभळतील. हे दोन म्हणजे - त्याची मुलगी भारती आणि उदय सांगाणी. 


देशात 400 अन् विदेशात 20 हून जास्त आश्रम…
आता हे तर निश्चित आहे की, आसारामचे उर्वरित आयुष्य जेलमध्येच जाणार आहे. साडेचार वर्षांपासून त्याच्या अनुपस्थितीत सर्व आश्रमांची देखभाल त्याची मुलगी भारती आणि पत्नी लक्ष्मी देवी करत होती. यादरम्यान दोघींनी आसारामच्या सर्व आश्रमांचे संचालन केले. यामुळे साधक आणि भक्तांचा विश्वास त्याच्यावर दृढ झाला. याशिवाय त्याचा आणखी एक विश्वासू उदय सांगाणीही आता आश्रमांचा कारभार पाहण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मानले जात आहे. सध्या देशामध्ये आसारामचे 400 आश्रम आहेत आणि विदेशात 20 हून अधिक आश्रम आहेत. देशात त्याच्या अनेक आश्रमांची जमीन वादग्रस्त ठरली आहे. यामुळे सरकार त्या जप्त करण्याची शक्यता आहे.

 

ऋषिप्रसाद नावाच्या मॅगझिनचे प्रकाशन

आसाराम आश्रमाद्वारे रचनात्मक प्रवृत्ती आणि आचार-विचारांच्या शुद्धीच्या नावावर ऋषिप्रसाद नावाचे मॅगझिन प्रकाशित केले जाते. हे मॅगझिन मार्केटमध्ये आसारामची मार्केटिंग हॅमरिंग करते. यामुळे साधक त्याच्या जाळ्यात अडकत जातात. एक काळ असाही होता, जेव्हा या मासिकाच्या 14 लाख प्रती छापल्या जायच्या. परंतु बाप-बेट्यावर बलात्काराचे आरोप लागून ते जेलमध्ये गेल्याने ती संख्या प्रचंड घटली.

 

मुलापेक्षा जास्त मुलीवर विश्वास
आसारामला जेवढा विश्वास आपली मुलगी भारतीवर आहे, तितका मुलगा नारायण सांईवर नाही. तसेही मागच्या साडेचार वर्षांपासून भारतीच आश्रमांचे संचालन करत आहे. या कामात त्या आता निपुणही झाल्या आहेत. भारतीसोबत त्यांची आई लक्ष्मी देवीही त्यांना सहकार्य करतात. दुसरीकडे आसारामच्या खूप जवळचे उदय सांगाणी ज्यांना आसाराम ‘हेन्यमेन’ म्हणायचा, ते आसारामचा पूर्ण आर्थिक कारभार सांभाळत आले आहेत. सर्व आश्रमांच्या उत्पन्नाची माहिती त्यांना आहे. आतापर्यंतचा पूर्ण कारभार उदयच सांभाळत आले आहेत. यामुळे आश्रमांच्या संचालनात आर्थिक व्यवहाराचे काम त्यांच्याकडेच सोपवले जाऊ शकते. उदय यांचे अनेक साधकही समर्थन करतात.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज विथ फॅक्ट्स...  

बातम्या आणखी आहेत...