आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूलबसमधून येत होता रडण्याचा आवाज, जवळ जाऊन पोलिसाने पाहिल्यावर झाला Shocking खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - स्कूलबसच्या ड्रायव्हरने चेक न करताच बस लॉक करून निघून गेला. बसमध्ये नर्सरीतील हरनूर ही चिमुरडी विद्यार्थिनी झोपलेली होती. दरम्यान, सर्व मुलांना घरी पोहोचवल्यावर ड्रायव्हरने बस रिकामी असल्याचे समजून सिव्हिल हॉस्पिटलजवळ बस उभी केली अणि घरी निघून गेला. परंतु, मुलगी घरी आली नाही म्हणून जेव्हा मुलीच्या आईने ड्रायव्हरला मुलीबाबत विचारणा केली, तेव्हा तो म्हणाला- माहिती नाही कुठे आहे, जा बसस्टँडवर शोधा!

 

बसमधून ओरडत होती चिमुरडी, कॉन्स्टेबलने काढले बाहेर
सुदैवाने त्या दिवशी गरमी नव्हती. बसमध्ये ओरडत असलेल्या चिमुरडीवर जवळून जात असलेल्या पोलिसाची नजर गेली. एसएचओचे गनमॅन गुरप्रीतसिंग गोपी आणि पीसीआर पथकातील हेड कॉन्स्टेबल कुलवंत राय तसेच कॉन्स्टेबल श्रीकृष्ण यांनी चिमुकलीला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, चिमुरडी तब्बल 45 मिनिटे बसमध्येच ओरडत होती. भेदरल्यामुळे मुलीची प्रकृती बिघडली होती. हरनूर बीआरएस नगरमधील सेक्रेड हार्ट कॉन्वेंट स्कूलमध्ये शिकते. मुलीचे वडील भूपिंदर सिंह यांचे वूल मार्केटमध्ये कालड़ा वूल स्टोअर नावाचे दुकान आहे.

 

मुलीच्या आईने केला आरोप

मुलीच्या आई सतिंदर कौर म्हणाल्या, शाळेच्या मोठ्या बसेस मुलांना सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळील स्टँडवर सोडतात आणि तेथून त्यांना छोट्या बस घेऊन पुढे जातात. त्यांनी आरोप केला की, दोन्ही बसेसच्या ड्रायव्हरच्या बेपर्वाईमुळे अनर्थ घडला असता. सतिंदर कौर यांनी दोन्ही ड्रायव्हरविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

 

अशी केली सुटका...
मी सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर चेकिं करत होतो. माझी नजर अचानक बसमध्ये ओरडत असलेल्या चिमुरडीवर गेली. मी बसजवळ गेल्यावर पाहिले तर बसच्या सर्व काचा बंद होत्या. खिडकीच्या काचेचे हँडल फिरवून काढता येण्यासारखे होते. मुलीला कसेबसे समजावून खिडकीजवळ बोलावले आणि तिला हँडल फिरवण्यासाठी सांगितले. तिने हळूहळू हँडल फिरवले. काच थोडीशी खाली येताच मी दोन्ही हातांनी ती दाबून आणखी खाली नेली. एवढ्यात पीसीआर पथकही तेथे पोहोचले. त्यांनी मदत करत काच खाली केली. थोडीशी जागा झाल्यावर आम्ही मुलीला यातूनच बाहेर काढले. 
- जसे कॉन्स्टेबल गुरप्रीतसिंग गोपी यांनी सांगितले..

 

दोन्ही ड्रायव्हरविरुद्ध तक्रार
चिमुरडीच्या आईची तक्रार मिळाल्यावर दोन्ही ड्रायव्हरना पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. तक्रारीच्या आधारे आरोपींविरुद्ध प्रकरण दाखल करण्यात आले आहे. 
-कुलदीप कौर, एएसआई, पोलिस ठाणे, डिवीजन नंबर 2  

 

बातम्या आणखी आहेत...