आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 20 रुपये खर्चात तब्बल 150 Km धावते ही इलेक्ट्रिक स्कूटर, एवढे हायटेक आहेत फीचर्स Okinawa Praise Electric Scooter Review; Ride Up To 150km In Single Charge

20 रुपये खर्चात तब्बल 150 km धावते ही इलेक्ट्रिक स्कूटर, एवढे हायटेक आहेत फीचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओकिनावा (Okinawa) ने डिसेंबर महिन्यात इंडियन ऑटो मार्केटमध्ये आपली नवी ई-स्कूटर प्रेज (Praise) लाँच केली होती. आता या स्कूटरची विक्री सुरू झाली आहे. ही पहिली अशी स्कूटर आहे जी बॅटरीवर सर्वात जास्त मायलेज देते. कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर 170 किलोमीटरपर्यंत चालवली जाऊ शकते. दुसरीकडे, टेस्टिंगदरम्यान याचे मायलेज 150km पर्यंत आढळले. तथापि, याची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 65,000 रुपये आहे. यापूर्वी ओकिनावाने रिज ई-स्कूटरही लॉन्च केलेली आहे.

 
# दमदार बॅटरी
- स्कूटरमध्ये एक 75 वॉट आणि दुसरी 45 वॉट AH VRLA ची लीथियम इऑन बॅटरी आहे. टर्बो चार्जरने ही बॅटरी 2 तासांत फुल चार्ज होते.
- स्कूटरला टर्बो स्विच देण्यात आलेले आहे. जे दाबल्यानंतर याची टॉप स्पीड 75 किलोमीटर प्रति तास होते.
- बॅटरीवर चार्ज केल्यानंतर 3 युनिट खर्च होतात. म्हणजेच जवळपास 20 रुपयांचा खर्च करून ही बाइक 150km पर्यंत चालवली जाऊ शकते.
- याची किल्लीही एखाद्या कारप्रमाणे आहे. म्हणजेच या स्कूटरला लॉक-अनलॉक केले जाऊ शकते. सोबतच लाइटही बंद करू शकतात.


# 3 ड्रायव्हिंग मोड
- प्रेजमध्ये 3 अॅडवांस ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. यात पहिले Eco, दुसरे Sporty आणि तिसरे Turbo आहे.
- Eco मध्ये टॉप स्पीड 35kph, Sporty ची टॉप स्पीड 65kph आणि Turbo ची टॉप स्पीड 75kph आहे.
- तुम्ही शहरात आणि हायवेच्या हिशेबाने ड्रायव्हिंग मोड सेट करू शकता. यात कारसारखे अॅडव्हान्स्ड सेन्सरही मिळतील.

 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ओकिनावा Praise ई-स्कूटरचे आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...