आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगींचे मंत्री म्हणाले- दुसऱ्या पक्षाच्या सभेला गेले तर माझा शाप लागले, तुम्हाला काविळ होईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजभर म्हणाले, सर्वाधिक दारु यादव आणि राजपूत पितात आणि बदनाम राजभर समाज होतो. - Divya Marathi
राजभर म्हणाले, सर्वाधिक दारु यादव आणि राजपूत पितात आणि बदनाम राजभर समाज होतो.

बलिया (उत्तर प्रदेश) - योगी सरकारमध्ये कोण कधी काय घोषणा करेल याचा नेम नाही. मुख्यमंत्री योगी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आणि भारतीय समाज पार्टीचे (सुहेलदेव) अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी जाहीर सभेत जनतेला शाप दिला आहे. रविवारी झालेल्या एका सभेत मंत्री राजभर म्हणाले, माझ्या पक्षाच्या रॅली शिवाय दुसऱ्या पक्षाच्या रॅलीला जो कोणी जाईल त्याला माझा शाप लागेल. त्याला काविळ होईल. हा रोग दूर करण्याचे उपचार फक्त माझ्याकडे आहेत. मी औषध दिल्याशिवाय ही काविळ जाणार नाही. 

 

ओम प्रकाश राजभर हे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि योगी सरकारवर नाराज आहेत. राज्यसभा निवडणुकीत त्यांनी त्यांची नाराजी जगजाहीर केली होती. जोपर्यंत भाजपाध्यक्ष अमित शहांची भेट होत नाही तोपर्यंत राज्यसभा निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. 

रविवारी झालेल्या महिला अधिकार रॅलीमध्ये राजभर यांनी त्यांच्या सभेला आलेल्या कार्यकर्त्यांना, आता दुसरीकडे गेले तर माझा शाप लागेल असेच सांगून टाकले आहे. 

 

उत्तर प्रदेशात दारुबंदीची मागणी 
- ओपी राजभर यांनी योगी सरकारने राज्यात दारु बंदी करावी अशी मागणी केली आहे. महिला अधिकार रॅलीत ते म्हणाले, 'दारु हा समाजाला लागलेला कँसर आहे. यामुळे गरीब आणखी गरीब होत जातात. महिलांना अकाली आपला पती, पिता आणि पुत्रांना गमवावे लागते. या सामाजिक रोगाचा मुळापासून निपटारा करेपर्यंत सुहेलदेव भारतीय समाज पार्टी लढत राहाणार आहे. यासाठी आम्हाला बलिदान देण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही.'
- राजभर म्हणाले, जर सरकारच्या तिजोरीत दारुचा पैसा जास्त जमा झाला तर राज्यात सुख-संपन्नता कशी नांदेल. आम्ही रामायण-महाभारत फार वाचले नाही, परंतू एवढे ऐकले आहे की जसे तुमचे उत्पन्न असेल, तशीच तुमच्याकडे संपन्नता येते, बरकत येते. दारुतून मिळालेल्या उत्पन्नाने राज्यात संपन्नता कशी येईल, असा सवाल राजभर यांनी केला. 

 

याआधीही केले आहे वादग्रस्त वक्तव्य 
- 28 एप्रिल रोजी मंत्री राजभर म्हणाले होते, सर्वाधिक दारुचे सेवन यादव आणि राजपूत करतात, मात्र बदनाम होतो, तो राजभर समाज. 
- योगी सरकारवर राजभर यांनी दलित विरोधी असल्याचाही आरोप केला होता. भाजप आणि योगी हेही जाती पाहून तिकीट वाटप करत असल्याचे ते म्हणाले होते. त्यासोबतच सबका साथ - सबका विकासची घोषणा देणारे सरकार बहुतेक जिल्हा पोलिस मुख्यालयात दलितांना नियुक्ती देत नाही.

 

बातम्या आणखी आहेत...