आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: येथे होते नवरदेवांची विक्री, करोडोंमध्ये लागते बोली; 9 दिवस भरते अशी यात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - नेहमीच म्हटले जाते की, लग्नाची रेशीमगाठ ही स्वर्गातूनच बांधून येते. परंतु आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी काहींना मात्र जरा जास्तच मेहनत करावी लागते. काही ठिकाणी तर नवरदेवांची सौदेबाजीच होते. बिहारमध्ये खासकरून नवरदेवांचाही एक बाजार भरतो. तुम्ही विचार करत असाल, भाजी बाजार, किराणाचा बाजार, कपड्यांचा बाजार तर ऐकला होता, पण नवरदेवांचा बाजार काय आहे बुवा!

 

अजब आहे बाजार
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात हा नवरदेवांचा बाजार भरतो. येथे सौराठ सभा म्हणजेच नवरदेवांचा बाजार 22 बिघा जमिनीवर 9 दिवसांपर्यंत भरतो. स्थानिक याला सभागाछी नावानेही ओळखतात. या यात्रेत आपल्या लाडक्या लेकीसाठी वडील सुयोग्य वराची निवड करण्यासाठी येतात. वराची निवड करून त्याला सोबत नेले जाते आणि लगेच लग्न लावून दिले जाते. एवढेच नाही, येथे नवरदेवाच्या योग्यतेनुसार सौदेबाजीही सर्रास चालते.

 

9 पिढ्यांचे पाहतात संबंध

9 दिवसांच्या या यात्रेत रजिस्ट्रेशनची महत्त्वाचे असते. जे स्थळ पसंत पडते, त्याला रजिस्ट्रेशन करणारेच मान्यता देतात. या पुरातन काळापासून चालत आलेल्या नोंदणी पद्धतीमध्ये वडिलांच्या आणि आजोळाच्या 9 पिढ्यांचे संबंध पाहिले जातात. यात कोणत्याही प्रकारचे संबंध आढळल्यास लग्नाला परवानगी मिळत नाही. म्हणजेच ब्लड रिलेशनमध्ये लग्न होत तर नाही ना हे पाहिले जाते.

नोंदणीकार सांगतात की, ही परंपरा 700 वर्षांपासून सुरू झाली. सन 1971 मध्ये येथे तब्बल 1.5 लाख लोक आले होते. सध्याच्या काळात येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. ते वैज्ञानिक कारणही देतात  की, वेगळ्या ब्लड ग्रुपमध्ये लग्न केल्याने जन्मणारे अपत्य सुंदर अन् सुदृढ निघते.

 

हुंडा प्रथा संपवण्यासाठी सुरू झाली यात्रा, पण आता उलट

लग्नाबद्दल वेगवेगळ्या समाजांमध्ये भिन्न-भिन्न चालीरीत आहेत. परंतु नवरदेवाची विक्री होताना पाहिली नसेल. येथील स्थानिकांच्या मते, बहुतांश जुन्या प्रथा-रूढी संपल्या आहेत. हुंड्याची प्रथा नष्ट करण्यासाठी तत्कालीन राजा हरिसिंह देव यांनी या यात्रेची सुरुवात केली होती.
परंतु आता परिस्थिती उलट आहे. येथे वधुपक्षाला वराच्या योग्यतेनुसार निर्धारित रक्कम द्यावी लागते. यामुळेच याचे महत्त्व कमी झाले आहे. तथापि, बिहार सरकारने हुंडा प्रथेविरुद्ध कडक पावले उचलली आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...