आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • बाप रे! घरात आढळले 111 कोब्रा नाग, पकडायला आलेल्या गारुड्यानेही ठोकली धूम OMG Farmer House Full Of 100 Baby Cobras In Odisha

बाप रे! घरात आढळले 111 कोब्रा नाग, पकडायला आलेल्या गारुड्यानेही ठोकली धूम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संबलपूर - ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यात एक घरामध्ये 2 कोब्रा नाग आणि त्याची 111 हून जास्त पिल्ले आढळली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सापांनापाहून घरातल्या सगळ्यांचीच भीतीने गाळण उडाली. त्यांनी सर्पमित्रांना कॉल केला. सर्पमित्रांच्या अथक प्रयत्नांनंतर सापाची सर्व पिल्ले तेथून काढता आली. टीमने सांगितले की, या सर्पांचा जन्म 2 ते 3 दिवसांपूर्वी झालेला होता. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. वन विभागाची टीम परिसरातील मोठ्या सापांच्या शोधात गुंतली आहे. ही घटना श्यामपूर गावातील असून येथे शेतकरी बिज भुयन यांच्या घरात एकूण 6 खोल्या आहेत. त्यांनी एका खोलीत 2 फूट उंच वारूळ झाले होते. ते त्या वारूळाची दररोज पूजा करून तेथे दूध अर्पण करायचे. तेथे नाग-नागिणीची जोडी राहत असल्याचे त्यांना माहिती होते. 

 

वन विभागाने जारी केला अलर्ट...
- यापूर्वीही या कुटुंबाने घरात साप पाहिले होते. परंतु त्या सापांना कुटुंबीयांना कोणताही त्रास दिला नव्हता. कुटुंबाची अशी श्रद्धा आहे की, या सर्पांमुळे त्यांच्या घरात समृद्धी आली. तथापि, घरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने साप आहेत, याची त्यांना कल्पना नव्हती.
- गत शनिवारी कुटुंबाने कोब्राची दोन पिल्ले पाहिली. त्यांना पकडण्यासाठी गारुड्याला त्यांनी पाचारण केले होते. गारुड्याने जेव्हा छोटे साप पकडण्यासाठी जमीन खोदली तेव्हा त्याची भीतीने बोबडीच वळली. कारण तेथे एक-दोन नाही, तर 111 सापाचे पिल्ले होते. यामुळे गारुडी प्रचंड भ्यायला आणि एवढे साप पकडायला त्याने नकार दिला. यानंतर सर्पमित्रांना फोन करण्यात आला.
- फॉरेस्ट ऑफिसर म्हणाले, पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्यासमोरचे दृश्य अविश्वसनीय होते. तेथे साप नाही, तर सापांचे मोठमोठे वेटोळे होते. फॉरेस्ट विभागाने अलर्ट जारी केला आहे की, परिसरात आणखीही साप असू शकतात. ते सर्व विषारी आहेत. सध्या टीमने या सापांची सुटका करून त्यांना रहिवासी भागापासून दूर नेऊन सोडले आहे.
- एक कोब्रा 20 ते 40 अंडी एका वेळी देतो. या अंड्यांतून पिल्लू येण्याचा काळ 60 ते 80 दिवसांचा असतो. यामुळे एकदा अंडी दिल्यावर एकाच वेळी एवढी सापांचा जन्म होणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचे आणखी Photos...  

बातम्या आणखी आहेत...