आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्सर दौऱ्यात नितीशकुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक; पायाभूत सुविधांबाबत नाराजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- बक्सर जिल्ह्याच्या नंदन तालुक्यातील विकास समिक्षा यात्रेसाठी गेलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ताफ्यावर शुक्रवारी संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केली. ताफ्यातील कोणालाही इजा झाली नाही, मात्र पोलिस कर्मचाऱ्यांसह १० जण जखमी झाले. ताफ्यासोबत जाणाऱ्या अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. दगडफेकीत नितीश यांना सुरक्षित हरियाणा फार्मात नेण्यात आले. दलित वस्तीत येऊन पायाभूत सुविधांची पाहणी करावी, अशी नंदनच्या ग्रामस्थांची मागणी होती. ताफा दलित वस्तीत घेऊन जाण्याच्या मागणीचा जोर वाढला व ताफ्यावर दगडफेक सुरू केली. सुरक्षारक्षकांनी मुख्यमंत्र्यांना नंदन पंचायत समितीच्या हरियाणा फॉर्ममध्ये नेले. परिवहन मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...