आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K: जिवंत ग्रेनेडला चेंडू समजून खेळत होती मुले; Blast मध्ये एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - काश्मिरात जिवंत ग्रेनेडला लहान मुले बॉल समजून खेळत असताना अचानक स्फोट झाला. या बॉम्बस्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला असून इतर 4 मुले जखमी आहेत. ही घटना शोपिया येथे घडली आहे. स्फोटाच्या 24 तासांपूर्वीच या परिसरात एनकाउंटर झाले होते. यामध्ये लष्कराने 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. एनकाउंटरनंतर हा ग्रेनेड त्याच ठिकाणी राहिला आणि मुलांनी चेंडू समजून त्यासोबत खेळण्यास सुरुवात केली. या मुलांपैकी एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर इतरांवर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांना शोपिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

शोपिया जिल्ह्यातील मेमनदर येथे घडलेल्या घटनेतील पीडित मुले भाऊ-भाऊ होती असे सांगितले जात आहे. दक्षिण काश्मिरचा सर्वाधिक दहशतवादग्रस्त म्हणूनही हा परिसर कुप्रसिद्ध आहे. याच परिसरात मंगळवारी चकमक झाली. त्यामध्ये सुद्धा एका नागरिकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोबतच, सुरक्षा रक्षकांवर दगडफेक होत असताना 120 नागरिक जखमी झाले होते. साधू गंगेच्या जंगलांमध्ये दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतरच सैनिकांनी शोध मोहिम राबवली असताना मंगळवारी चकमक उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...