आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • One Killed In Major Accident Sehore Madhya Pradesh भावाबहिणीला टँकरने चिरडले

टँकरने चिरडल्यावर मदतीसाठी ओरडली बहीण; भाऊ तडफडून झाला शांत, 2 तुकड्यांत मिळाला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालापीपल/सिहोर (मप्र) - शहरापासून एक किमी अंतरावरील भोपाळ रोडवर वेअर हाऊससमोर सोमवारी दुपारी 1.15 वाजता टँकर चालकाने लग्नाची खरेदी करण्यासाठी निघालेल्या 19 वर्षीय दीपक आणि त्याची 30 वर्षीय बहीण प्रियंकासह सायकलस्वाराला चिरडले. 

 

असा झाला अपघात...
आलनिया गावातील रहिवासी एलम सिंह आपला पुतण्या दीपक व प्रियंकासोबत कालापीपलहून गावाकडे जात होते. 18 एप्रिलला प्रियंकाचे लग्न आहे आणि तिघेही लग्नाच्या खरेदीसाठी निघाले होते. दीपक आणि प्रियंकाला मोटारसायकलसोबत सोडून एलम सिंह काही कामानिमित्त गेले. तेवढ्यात टँकरने त्यांना व सायकलस्वार रमेशचंद्र (60) यांना चिरडले.

भाऊ-बहीण टँकरच्या चाकाखाली दबलेले होते. लोकांनी प्रियंकाला 10-15 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढले. दीपकचा मृतदेह 1 तासानंतर जेसीबीच्या मदतीने टँकर उलटवल्यावर काढता आला.


बराच वेळ तडफडून शांत झाला...
चाकाखाली दबलेली प्रियंका ओरडत होती, वाचवण्याची विनंती करत होती, परंतु काही वेळातच दीपकने दम तोडला. त्याचा मृतदेह क्षत-विक्षत झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, जेव्हा क्रेनने टँकर उलटला तेव्हा दोन तुकड्यांमध्ये दीपकचा मृतदेह होता, त्याच्या शरीराचा मधला भाग गायब होता. दुसरीकडे, जखमी प्रियंका आणि रमेशचंद्र यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना भोपाळला रेफर करण्यात आले.

 

कुटुंबात एकुलता भाऊ होता दीपक
दीपक 3 बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता आणि 10वीत शिकत होता. त्याच्या वडिलांना लकवा झालेला आहे. तो काका आणि बहिणीसोबत खरेदीसाठी निघाला होता. अपघातानंतर घटनास्थळी बॅगमध्ये भरलेले प्रियंकाचे लग्नाचे सामान आढळले. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...