आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आमदार फुटण्याच्या भीतीने एवढे पैसे केले जाताहेत खर्च, You Cant Imagine One Night Rent Of Hyderabad Luxury Hotel Where Today Congress And JDS MLA Stayed

आमदार फुटण्याच्या भीतीने एवढे पैसे केले जाताहेत खर्च, या लक्झरी सुविधा पाहिल्यावर डोळे दिपून जातील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - BJPला 28 तासांत बहुमत सिद्ध करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कर्नाटकाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर आदळआपट सुरू झाली आहे. काँग्रेसने आपल्या आमदारांना भाजपपासून वाचवण्यासाठी आता हैदराबादच्या 5 स्टार हॉटेल कृष्णामध्ये शिफ्ट केले आहे. पक्षाने आमदारांसाठी तब्बल 120 रूम बुक केल्या आहेत. यात जनता दल (सेक्युलर) चे आमदारही सामील आहेत. हॉटेलच्या वेबसाइटनुसार, सध्या येथे पुढच्या 2 दिवसांसाठी कोणतीही रूम शिल्लक नाहीये. 

 

# 96 हजार रुपये- सर्वात महागड्या रूमचे 1 दिवसाचे भाडे
- हॉटेलमध्ये 6 वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार एकूण 248 रूम आणि 13 सुइट आहेत. मिनिमम भाडे 8960 रु. आणि जास्तीत जास्त 96 हजार रु. प्रति दिवसापर्यंत आहे. हे भाडे टॅक्स धरून आहे.

- डिलक्स रूम (किंग बेड, सिटी व्ह्यू) ला 7 हजार रु. प्रति रात्र यादराने बुक केले जाऊ शकते. टॅक्ससहित हे रेट 8960 रु. होईल. यात अॅक्सेसेबल लाइट स्विच, कनेक्टिंग रूम, इंटरनेट अॅक्सेस, मिनी बार, कॉफी/टी मेकर यासारख्या अनेक सुविधा रूममध्ये मिळतात.

- ताज क्लब रूम (किंग बेड, सिटी व्ह्यू) ला 11 हजार रु. प्रति रात्र (टॅक्स सहित 14080 रु.) मध्ये बुक केले जाऊ शकते. यात बाथटब, कॉफी/टी मेकर, मिनी बार, अॅक्सेसबल लाइट स्विच, एचडी टीव्ही, इंटरनेट अॅक्सेस यासारख्या तमाम सुविधा मिळतात.

- डिलक्स सुटला एका रात्रीसाठी 26,250 रुपये (टॅक्ससहित 33,600 रु.) मध्ये बुक केले जाऊ शकते. यात लेक व्ह्यू मिळतो. याशिवाय इतर रूम्ससारख्या सर्व सुविधा यात असतात.

- लक्झरी सुटला एका रात्रीसाठी 37,500 रुपये (टॅक्ससहित 48000 रु.) मध्ये बुक करता येईल. यातही किंग बेडसेाबतच लेक व्ह्यू मिळतो. सोबतच तमाम सुविधाही मिळतात.
- प्रेसिडेंशियल सुटला 1 रात्रीसाठी 75 हजार रुपये (टॅक्स सहित 96000 रु.) मध्ये बुक केले जाऊ शकते. ब्रेकफास्ट, वन वे ट्रान्सफरसोबतच 4 डिव्हाइससाठी वायफाय कॉम्प्लिमेंटरी ऑफर केले जाते. याशिवाय इतर रूमप्रमाणे सर्व सुविधा येथे दिल्या जातात. 140 स्क्वेअर मीटरचा लेक व्ह्यू आहे. एअरपोर्टवरून पिकअपची सुविधाही दिली जाते.

 

# कसे आहे हॉटेल?
- येथे थांबणारे पाहुणे ताज लाउंज, बटलर सर्व्हिसेससोबतच दुसऱ्या फॅसिलिटीजचा वापर करू शकतात. हॉटेल सिटी सेंटरपासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आहे.
- स्पा, वायफाय, मिनी बार, आऊटडोर पूल, फिटनेस सेंटर, 8 मीटिंग रूम, बिझनेस सेंटरसोबतच येथे तमाम इतर सुविधाही ग्राहकांना ऑफर केल्या जातात. जगभरातील विविध देशांतील वेगवेगळी व्यंजने येथे चाखायला मिळतात.
- हॉटेलच्या वेबसाइटवर दावा करण्यात आला आहे की, हैदराबादचे हे एकमेव असे हॉटेल आहे, ज्यात प्रायव्हेट टेरेस गार्डनसोबतच प्रेसीडेंशियल सुइट आहे. शहरातील सर्वात लकझरी रेस्टॉरेंट्समध्ये मोजकेच काही येथे आहेत. यात स्पेशल चायनीज कुजिन आणि हैदराबादी व्यंजनांचा स्वाद घेतला जाऊ शकतो. याशिवाय हॉटेलमध्ये बिझनेस सेंटर, मीटिंग रूमसोबतच लक्झरी कॉन्फ्रेंस हॉलही आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कर्नाटक निवडणूक निकालाचे इन्फोग्राफिक्स...

बातम्या आणखी आहेत...