आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी लंकेश मर्डर: एक संशयीत आरोपी ताब्यात, अवैध पद्धतीने शस्त्र बाळगल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळूरू- गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांच्या हाती एक महत्वाचा पूरावा लागला आहे. स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम(SIT)ने शुक्रवारी बंगळूरू येथून एका संशयीत आरोपीला ताब्यात घेतले आहे. नवीन कुमार (37) असे आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर अवैध पद्धतीने हत्यार बाळगल्याचा आरोप आहे. एसआयटीचे तापस अधिकारी आणि डेप्यूटी कमिश्नर एम एन अनशेट यांनी सांगितले की, नवीन कुमारला लोकल पोलिसांनी 19 फेब्रुवारीला एक रिवॉल्वर आणि 15 बुलेटसह अटक केली होती. चौकशी करण्यासाठी त्याला क्राइम ब्रांचकडे पाठवण्यात आले. शुक्रवारी त्याची रिमांड संपणार होती, परंतु, हत्येच्या प्रकरणातील पुराव्यांच्या आधारावर एसआयटीने नवीनला ताब्यात घेतले आहे.

 

स्केचशी मिळता-जुळता आहे संशयीताचा चेहरा.... 
- पोलिसांनुसार, अवैध शस्त्र बाळगल्याच्या आरोपात आरोपी नवीन कुमारवर आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टाने त्याची विचारपूस करून त्याला न्यायालियीन कोठडीत पाठवले होते. तेथे त्याने गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी संबंधीत महत्वाची माहिती पोलिसांनी दिली. या आधारे पोलिस पुढील तपास करण्यासाठी त्याला कस्टडीत ठेवणार आहेत.
- शुक्रवारी कोर्टाने नवीनची कस्टडी 8 दिवसांनी वाढवली आहे. पोलिस सुत्रांनुसार, आरोपीचा चेहरा केसशी संबंधीत संशयीताच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता आहे.

 

अशी झाली होती गौरी लंकेश यांची हत्या...?
- गौरी लंकेश, कन्नड कवि आणि पत्रकार पी लंकेस यांची सर्वात मोठी मुलगी होती. त्या साप्ताहिक 'लंकेश पत्रिका'च्या संपादिका होत्या. 5 सप्टेंबरला गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी गोळी मारून हत्या करण्यात आली होती.
- हल्लेखोरांनी त्यांच्यावर अतिशय जवळून 7 राउंड फायरिंग केली होती. या हल्ल्यात घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला होता. या पूर्वी देखील त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.
- शेजाऱ्यांच्या मते, गौरी लंकेश यांचे वय 55 वर्ष होते. हल्ल्याच्या वेळी गौरी आपल्या घराचा मेन गेट उघडत होत्या. तेवढ्यात त्यांच्या डोक्या आणि छातित 3 गोळ्या लागल्या, तर भिंतींवर 4 गोळ्यांचे निशान आढळून आले आहेत.

 

पुढील स्लाइडवर पाहा पोलिसांनी जारी केलेले संशयीत आरोपीचे स्केच....

बातम्या आणखी आहेत...