आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

POLITICS: ओवेसींचे मोदी, अमित शहांना खुले आव्हान; हैदराबादेतून निवडणूक लढवूनच दाखवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पीएम नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांना खुले आव्हान दिले आहे. हैदराबाद येथील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, की येथून खुद्द मोदी आणि शहांनी निवडणूक लढवून दाखवावी. ते सुद्धा एमआयएमला पराभूत करू शकणार नाहीत. एवढेच नव्हे, तर हैदराबादेतून निवडणूक लढवण्यासाठी आपण साऱ्या राजकीय पक्षांना आव्हान देतो असेही ते पुढे म्हणाले. 


वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत
याच वर्षाच्या सुरुवातीला पक्षाचे 60 वे वर्धापन दिवस साजरा करताना ओवेसी म्हणाले होते, की "मोदींमध्ये दम असल्यास त्यांनी 2019 पूर्वी निवडणूक करूनच दाखवावी. जनता त्यांना आणि भाजपला धडा शिकवेल. सरकारच्या वर्षांच्या कार्यकाळाने लोकांना निराश केले आहे." 25 जून रोजी बीड येथे बोलताना त्यांनी, उठा हक्कांसाठी लढा. जिवंत राहायचे असेल तर आपल्या लोकांना मतदान करून जिंकून द्या. असे म्हटले होते. सोबतच धर्मनिरपेक्षतेचे वचन देणारा काँग्रेस पक्ष हा गेल्या 70 वर्षांपासून मुस्लिमांचा वापर करून घेत आहे असेही ओवेसी म्हणाले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...