आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम) चे नेते असदुद्दीन ओवेसींनी 'पद्मावत' ही बकवास फिल्म असल्याचे म्हटले आहे. ओवेसींनी शुक्रवारी वारंगल येथील एका सभेत मुस्लिमांना आवाहन केले, की हा चित्रपट पाहून वेळ वाया घालवू नये. संजय लीला भन्साळींची फिल्म पद्मावत 25 जानेवारीला देशभरात प्रदर्शीत होणार आहे. या फिल्मला राजपूत समाज, राजघराणे आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. देशभरात चित्रपट प्रदर्शनाला विरोध होता. रस्त्यावरील विरोधासोबत कोर्टातूनही चित्रपटावर बंदी आणण्याचे प्रयत्न झाले.
'पद्मावत'वर काय म्हणाले ओवेसी ?
- ओवेसी म्हणाले, 'पद्मावत पाहाण्यासाठी जाणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. ही बकवास फिल्म आहे. अल्लाहने तुम्हाला यासाठी नक्कीच धरतीवर पाठवले नाही की तुम्ही 2 तास फिल्म पाहात बसावे.'
- 'मिस्टर नरेंद्र मोदींनी या फिल्मसाठी 12 सदस्यांची समिती नेमली. त्यांना सांगितले की जे काही काढता येईल ते काढून टाका. मात्र आमच्या विरोधातील ट्रिपल तलाकचा कायदा तयार करताना कोणाचाही सल्ला घेतला नाही.'
मुस्लिमांनी राजपुतांकडून काही शिकावे
- ओवेसी म्हणाले, 'मुस्लिमांनी राजपुतांकडून काही शिकले पाहिजे. या फिल्मच्या विरोधात ते एकजूट झाले आहेत.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.