आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pak Rangers Ring Up BSF To Stop Firing As Trooper Killed, Assets Destroyed Across IB

पाक रेंजर्सनी गुडघे टेकले; फाेनवर केली कारवाई थांबवण्याची विनंती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारताकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरामुळे लष्कराने पाकच्या अनेक चौक्या उध्वस्त केल्या आहेत. - Divya Marathi
पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारताकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरामुळे लष्कराने पाकच्या अनेक चौक्या उध्वस्त केल्या आहेत.

जम्मू - सीमेवर विनाकारण गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी रेंजर्संनी बीएसएफच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर गुडघे टेकले. रविवारी जम्मू बीएसएफला फोन करून गोळीबार थांबवण्याची विनंती केली. दोन्ही पक्षांनी सीमेवर शांतता ठेवण्यासह नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी वेळोवेळी बैठक घेण्यास सहमती दर्शवली. पाकच्या सीमेवरील गोळीबाराला बीएसएफने जोरदार कारवाई सुरू केली. शेवटी घाबरून पाक अधिकाऱ्याने बीएसएफला कारवाई थांबवण्याची विनंती केली.

 

पाकिस्तानमध्ये मोठ्याप्रमाणात नुकसान झाले
मागील चार दिवसांपासून पाकिस्तानी रेंजर्स सीमेवर गोळीबार करत आहेत. बीएसएफने प्रत्युत्तर दिल्यानंतर एका पाक रेंजरचा मृत्यू झाला. तीन दिवसांत पाकिस्तानच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बीएसएफने १९ सेकंदांचे थर्मल इमेजरी फुटेज जारी केले आहे. यात नुकसान दिसत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...