आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pak Rangers Ring Up BSF To Stop Firing As Trooper Killed, Assets Destroyed Across IB

भारतासमोर गुडघे टेकल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एका जवानासह 4 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी भारतीय जवानांनी कुपवाडामधील हिंदवाडा येथे 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. - Divya Marathi
शुक्रवारी भारतीय जवानांनी कुपवाडामधील हिंदवाडा येथे 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

जम्मू- पाकिस्तानने सोमवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. अंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये आज सकाळी जोरदार गोळीबार आणि बॉम्ब वर्षाव करण्यात आला. यात एका पोलिस कर्मचाऱ्यासह एक महिला आणि तीन नागरिक जखमी झाले. पाकिस्तानकडून सोमवारी पाहाटेपासून गोळीबार होत आहे. 

 

पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारताकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. रविवारी बीएसएफकडून दावा करण्यात आला, की त्यांनी पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत पाकिस्तानी रेंजर्सने अखेर गुडघे टेकल्याचे बीएसएफने म्हटले होते. शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या फायरिंगमध्ये एक जवान शहीद झाला होता, तर चार नागरिकांचा मृत्यू झाला होता. 

 

बीएसएफने व्हिडिओ जारी केला 
- बीएसएफने भारतीय जवानांनी केलेल्या जोरदार कारवाईचा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये  पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त होत असल्याचे दिसत आहे.   

 

गुडघे टेकले... 

सीमेवर विनाकारण गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी रेंजर्संनी बीएसएफच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर गुडघे टेकले. रविवारी जम्मू बीएसएफला फोन करून गोळीबार थांबवण्याची विनंती केली. दोन्ही पक्षांनी सीमेवर शांतता ठेवण्यासह नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी वेळोवेळी बैठक घेण्यास सहमती दर्शवली. पाकच्या सीमेवरील गोळीबाराला बीएसएफने जोरदार कारवाई सुरू केली. शेवटी घाबरून पाक अधिकाऱ्याने बीएसएफला कारवाई थांबवण्याची विनंती केली.

 

पाकिस्तानमध्ये मोठ्याप्रमाणात नुकसान झाले
मागील चार दिवसांपासून पाकिस्तानी रेंजर्स सीमेवर गोळीबार करत आहेत. बीएसएफने प्रत्युत्तर दिल्यानंतर एका पाक रेंजरचा मृत्यू झाला. तीन दिवसांत पाकिस्तानच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बीएसएफने १९ सेकंदांचे थर्मल इमेजरी फुटेज जारी केले आहे. यात नुकसान दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...