आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PAKला भिकेचे डोहाळे: भारताशी स्पर्धा करण्यासाठी एवढा कर्जात बुडालाय शेजारी Pakistan May Soon Have World's 3rd Largest Nuclear Stockpile

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PAKला भिकेचे डोहाळे: भारताशी स्पर्धा करण्यासाठी एवढा कर्जात बुडालाय शेजारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तान वेगाने आपला अण्वस्त्र साठा वाढतोय का? हे आम्ही नाही, तर आर्म्ड हिस्ट्री अँड ग्लोबल अफेयरचे एक्स्पर्ट जोसफ व्ही. मिकलेफ म्हणताहेत. त्यांनी आपल्या एका लेखात लिहिले आहे की, साऊथ एशियासाठी पाकिस्तान सर्वात मोठा धोका आहे. आता प्रश्न हा आहे की, एकीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर आहे. जीडीपी अनेक अब्ज डॉलरच्या कर्जाखाली दबलेला आहे. अन् अशा वेळी पाकिस्तान आपल्या जीडीपीचा सर्वात जास्त खर्च अण्वस्त्र आणि शस्त्रास्त्रांचा साठा वाढवण्यासाठी करत आहे. 

 

काय लिहिलंय लेखात..
- मिकलेफ यांनी आपल्या लेखात लिहिलंय की, पाकिस्तानचा कमी ताकदीच्या अण्वस्त्रांच्या तैनातीचा निर्णय दक्षिण आशियासाठी मोठा धोका आहे.
- मिकलेफ यांनी या अण्वस्त्रांपर्यंत पाकिस्तानच्या जिहादी आणि दहशतवादी संघटना पोहोण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
- पाक सरकारचा तालिबान, तहरीक-ए-जिहाद इस्लामी, जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तैयबा तसेच हिज्बुल मुजाहिद्दीन यासारख्या दहशतवादी संघटनांशी घनिष्ठ नाते राहिलेले आहे.
- दुसरीकडे, अल कायदा समर्थित अन्सार गजवत उल हिंदचे नावही भारतात दहशतवादी कारवायांसाठी येत आलेले आहे.

 

युरेनियम आणि प्लुटोनियमचा साठा
- मिकलेफ यांच्या मते, पाकिस्तान मगाच्या 48 वर्षांपासून गुपचूप अण्वस्त्रांची निर्मिती करत राहिला आणि जगाच्या इतर भागांमध्ये त्याचा चुकीचा वापर करत राहिला आहे.
- चीन क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी पाकिस्तानची मदत करत आलेला आहे. पाकिस्तानकडे सध्या 140 ते 150 अण्वस्त्रे (अणुबॉम्ब) आहेत.
- पाकिस्तान अण्वस्त्र निर्मितीसाठी 3 ते 4 हजार किलो संवर्धित युरेनियम आणि 200 ते 300 किलोपर्यंत प्लुटोनियमचा स्टॉक ठेवतो.

 

भारताच्या पुढे गेलाय पाकिस्तान
- न्यूक्लियर व्हेपन्सच्या रिपोर्टनुसार, अण्वस्त्रांच्या बाबतीत रशिया सर्वात पुढे आहे. त्यांच्याकडे तब्बल 6800 न्यूक्लियर बॉम्ब आहेत.
- दुसरा नंबर अर्थातच अमेरिकेचा येतो. त्यांच्याकडे 6600 बॉम्ब आहेत.
- यानंतर फ्रान्स (300), चीन (270), ब्रिटन (215), पाकिस्तान (140), भारत (130) आणि इस्रायल (80) चा नंबर येतो.  

बातम्या आणखी आहेत...