आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ले देऊ नका, आम्हाला आमची शक्ती माहिती आहे: पाकच्या वक्तव्यावर सरकारचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल म्हणाले, भारताने कट कारस्थानांचा आरोप लावण्याऐवजी स्वतःच्या ताकदीवर निवणूक जिंकावी. - Divya Marathi
पाकचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल म्हणाले, भारताने कट कारस्थानांचा आरोप लावण्याऐवजी स्वतःच्या ताकदीवर निवणूक जिंकावी.

नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी रविवारी मणिशंकर अय्यर  यांच्यावर गुपचूप पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भेटले असा आरोप केला. मोदींच्या वक्तव्यानंतर राजकारण अधिक तापले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी सोमवारी म्हटले की, निवडणुकीच्या वादात पाकिस्तानला ओढू नका. स्वतःच्या ताकदीवर निवडणुका जिंका. त्यावर सरकारने म्हटले, आम्हाला आमची ताकद माहिती आहे कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. काँग्रेसने भाजपवर दुसऱ्या टप्प्यात ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप केला आहे. 


काँग्रेसचा नकार, नंतर भेटीबाबत दिला दुजोरा 
मोदींनी जेव्हा रविवारी काँग्रेस नेत्यांच्या पाकिस्तानी उच्चायुक्ताशी भेटीचा आरोप लावला तेव्हा काँग्रेसने अशी भेटच झाली नसल्याचे म्हटले. पण सोमवारी 'इंडियन एक्सप्रेस' वृत्तपत्राने या मिटींगची बातमी छापली तेव्हा काँग्रेसने मिटींग झाली असल्याचे मान्य केले. या मिटींगला माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर हेही होते. वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले, या मिटींगला मीही होता, त्यावेळी भारत-पाकिस्तानदरम्यानच्या नात्याबाबत चर्चा झाली होती. 


भाजपने मागितले उत्तर 
त्यानंत भाजपच्या वतीने कायदेमंत्री समोर आले, ते म्हणाले पाक म्हणतो भारताच्या या प्रकरणाशी आम्हाला काही देणे घेणे नाही. ही मिटींग गुजरात निवडणुकांच्या वेळीच का झाली. मणिशंकर अय्यर यांच्या घरी बैठक झाली. आता हे समोर आले की, मनमोहनही बैठकीला होते. आधी तर ते नकार देत होते. आनंद शर्मांनी काल स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले अशी कोणतीही मिटींग झालीच नाही. आज ते मान्य करत आहेत. 


भारताचे आरोप निराधार 
पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या फैजल यांनी सोमवारी ट्वीट केले. भारताने अंतर्गत निवडणुकीत पाकिस्तानला ओढता कामा नये. भारताने आमच्यावर कट कारस्थानाचा आरोप लावण्याऐवजी स्वतःच्या ताकदीवर निवडणुका जिंका. आमच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. काँग्रेसचे आनंद शर्मा म्हणाले, पंतप्रधानांनी काँग्रेसवर पाकच्या मदतीने कट रचल्याचा केलेला आरोप लज्जास्पज आहे. हा ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. यावरून भाजपचा पराभव निश्चित असल्याचे दिसत आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...