आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू - पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या पंुछ जिल्ह्यातील सीमावर्ती गावावर उखळी तोफा डागल्या. बालाकोट सेक्टरमध्ये रविवारी सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत डागलेल्या उखळी तोफाच्या माऱ्यात एकाच कुटुंबातील तीन मुलांसह ५ जण ठार झाले. कुटुंबातील तीन बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच लष्करातील एका अधिकाऱ्यांसह पाच जवान जखमी झाले. त्यांना उधमपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियंत्रण रेषेपासून तीन ते चार किमी अंतरावरील गावांवर पाक लष्कराने सकाळी पावणे आठच्या सुमारास उखळी तोफा डागण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराने यास चोख प्रत्युत्तर दिले. हा गोळीबार सुमारे चार तास सुरू होता.
जखमी दाेन बहिणींना लष्कराने हेलिकाॅप्टरद्वारे हलविले
बालाकोट येथील रहिवाशी रमजानच्या घरात पाकिस्ताने डागलेल्या उकळी ताेफेचा गाेळा एक गाेळा पडला. त्यात संपूर्ण घर खाक झाले. या हल्ल्यात रमजान, त्यांची पत्नी मलका बी (३२), मुलगा अब्दुल रहमान (१४), मोहम्मद रिजवान (१२) अाणि रजाक रमजान (९) यांचा मृत्यू झाला. तर रमजान यांच्या दाेन मुली नसरीन कौसर (११) अाणि महरीन कौसर (७) गंभीर जखमी झाल्या. वायूसेनेच्या जवानांनी दुपारी १२.३९ वा. हेलिकाप्टरने लिफ्ट करुन केवळ अर्ध्यात तासाच जम्मू येथील रुग्णालयात दाखल केले.
पाकिस्तानचे अाणखी एक घाणेरडे कृत्य : भारताच्या राजदूतांना त्रास
पाकिस्तानातील भारतीय राजदूतांना त्रस्त केले जात अाहे. तिथे त्यांचा पाठलाग केला जाताे, अपशब्दही वापरले जातात. याबाबत भारताने इस्लामाबादेतील अापल्या उच्चायुक्तांमार्फत मागील तीन महिन्यात सुमारे १३ वेळा पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे लेखी तक्रारही दाखल केली अाहे. यात भारतातील काही अधिकाऱ्यांना त्रस्त केले जात असल्याच्या, अपशब्द वापरले जात असल्याच्या तक्रारींचा समावेश अाहे. भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले, रविवार भारतीय मिशनचे सेकंड सेक्रेटरी हाॅटेलात जात असताना अज्ञात लाेकांनी कारमधून त्यांचा पाठलाग केला. मोबाइल फोनवरुन त्यांचे व्हिडिअाे चित्रीकरणही केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.