Home | National | Other State | Pakistani military firing on Line of Control, two jawans martyred

नियंत्रण रेषेवर पाकिस्‍तानी लष्‍कराचा गोळीबार, दोन जवान शहीद

वृत्तसंस्था | Update - Apr 11, 2018, 04:31 AM IST

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात जखमी झालेले दोन

  • Pakistani military firing on Line of Control, two jawans martyred

    जम्मू - जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात जखमी झालेले दोन जवान शहीद झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, पाक लष्कराने सोमवारी रात्री छोटी स्वयंचलित शस्त्रे व तोफगोळ्यांनी मारा केला. यात रायफलमॅन विनोद सिंह आणि जॉकी शर्मा गंभीर जखमी झाले होते.

    उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. हे दोन्ही जवान जम्मू-काश्मीरचेच रहिवासी होते. २४ वर्षांचे विनोद सिंह अखनूर जिल्ह्यातील दानापूर तर ३० वर्षीय जॉकी शर्मा हिरानगर जिल्ह्यातील सन्हैल गावाचे होते.

Trending