आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमध्ये राहून राम रहीमची लाडकी हनीप्रीत झाली परेशान, कोर्टाला केली 'ही' विनंती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा -  2 साध्वींवरील बलात्कार प्रकरणात 25 ऑगस्ट 2017 रोजी राम रहीमला दोषी ठरवण्यात आले होते. यानंतर पंचकुलामध्ये दंगा उसळला होता. या प्रकरणात हनीप्रीतला मुख्य आरोपी बनवण्यात आलेले आहे. सध्या ती अंबालाच्या सेंट्रल जेलमध्ये कैदेत आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमची 'लाडकी' लेक हनीप्रीत तुरुंगात चांगलीच त्रस्त झाली आहे. सोमवारीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तिची पंचकुला कोर्टात सुनावणी करण्यात आली. 

 

रोज अर्धा तास फोन करू देण्याची विनंती

यादरम्यान, हनीप्रीतने वकिलांच्या माध्यमातून कोर्टात एक अर्ज केला आहे. या अर्जानुसार, हनीप्रीतला तिच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलायचे आहे. ज्याप्रमाणे इतर कैदी दररोज अर्धा तास कुटुंबीयांशी फोनवर बोलू शकतात, तिलाही बोलायचे आहे.

 

सध्या कोर्टाने हनीप्रीतच्या या अर्जावर पुढची सुनावणी 7 ऑगस्टला ठेवली आहे. दुसरीकडे, सरकारी पक्षाने सुरक्षेच्या कारणांमुळे हनीप्रीतच्या या मागणीला कडाडून विरोध केला आहे. तत्पूर्वी, कोर्टाने हनीप्रीतची जामीन याचिकाही फेटाळली होती.

 

हनीप्रीत लागले आहेत एवढे कलम

हरियाणा पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) ने हनीप्रीतसहित 22 जणांना पंचकुला हिंसेमध्ये आरोपी बनवलेले आहे. यामुळे हनीप्रीत मागच्या 270 दिवसांपासून अंबाला सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. हनीप्रीतविरुद्ध FIR नंबर 345 मध्ये  भादंविचे कलम 121, 121ए, 216, 145, 150, 151, 152, 153 आणि 120बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

कोण आहे हनीप्रीत....
हनीप्रीत ही बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या राम रहीमच्या एवढी जवळची होती की, पावला पावलावर ती त्याच्यासोबत सावलीसारखी राहायची. प्रियंका तनेजा हे तिचे मूळ नाव. ते बदलून राम रहीमने हनीप्रीत ठेवले. तिला बनवण्यात बाबाचा मोठा हात आहे. राम रहीमने हनीप्रीतच्या घटस्फोटानंतर तिला आपली मानलेली मुलगी बनवले होते. तथापि, हनीप्रीतच्या माजी पतीच आरोप होता की, बाबा आणि त्याच्या पत्नीचे अवैध लैंगिक संबंध होते. ज्यामुळे त्याने हनीप्रीतपासून घटस्फोट घेतला होता. 
-दुसरीकडे, डेराप्रमुख गुरमित राम रहीमचे सेवादार भूपिंदर सिंग म्हणाले होते की, बाबाची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीतमुळे बाबाच्या कुटुंबात नेहमी वाद व्हायचे. सर्व कुटुंबीय तिचा विरोध करत होते. कारण गुरमित हनीप्रीतसोबत राहून इतरांना पाण्यात पाहायचा. डेऱ्यातही चर्चा व्हायची की दोघांचे अवैध संबंध आहेत. भूपिंदर सिंग म्हणाले की, याची एकदाची पूर्ण चौकशी व्हायलाच पाहिजे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...    

 

बातम्या आणखी आहेत...