आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचकुला हिंसाचारप्रकरणी गुरमीत देशद्रोहातील आरोपी क्रमांक 50

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला -  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग इन्सा याच्यावर देशद्रोह केल्याचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पंचकुलामध्ये २५ ऑगस्ट २०१७ रोजी हिंसाचार घडवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष पोलिस पथकाने (एसआयटी) शुक्रवारी न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

 

यात गुरमीतला आरोपी क्रमांक-५० करण्यात आले   आहे. पंचकुला येथे दहा महिन्यांपूर्वी उफाळलेल्या हिंसाचारात गुरमीतला आरोपी करण्याचा निर्णय राकेश इन्सा याने दिलेल्या जबाबानंतर घेण्यात आला. राकेश डेराच्या कोअर कमिटीचा सदस्य होता. सध्या तो तुरुंगात आहे. साध्वीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात  निर्णय येण्यापूर्वीच डेराप्रमुखाने आदित्यकडे पंचकुला योजनेवर काम कोठवर आले? अशी विचारणा डेराप्रमुखाने केली होती, असा दावा एसआयटीने आरोपपत्रात  केला आहे.

 

पंचकुला येथे लाखो लोकांना गोळा करण्याचा कट सिरसा येथील डेऱ्यामध्ये रचला गेला. हिंसाचार घडवण्याच्या कटात सहभागी असलेले डेऱ्यातील लोक गुरमीतच्या नेतृत्वाखाली काम करत होते, असा दावा एसआयटीने केला आहे.  

 

१२ ऑगस्ट रोजी ठरले निकालाच्या दिवशी काय करायचे?  
आरोपपत्रानुसार, गुरमीतचा विश्वासू राकेश इन्सा याने जबाबात म्हटले की, १७ ऑगस्ट २०१७ रोजी डेरा सच्चा सौदा सिरसा येथे ४५ सदस्यांच्या समितीची एक बैठक झाली. यात पंचकुलामध्ये दंगल भडकावण्यासाठी कोण काय काम करणार याचे नियोजन ठरले. सर्व योजना गुरमीतची मानलेली मुलगी हनीप्रीत व आदित्य इन्सा यांनी ठरवली.
 
पंचकुलामध्ये येणाऱ्या लोकांना तेथे सत्संग होणार असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान, चमकौर सिंगसह अनेक लोकांना पैसे गोळा करण्याचे सांगण्यात आले. लोकांची जेवणाची सोय त्यांच्यावर सोपवण्यात आली. लोकांना पंचकुलामध्ये ओळखण्यासाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या.  
 
 या बैठकीत असेही ठरले की, पंचकुला न्यायालयाने जर गुरमीतच्या विरोधात निर्णय दिला तर सरकारला कसा धक्का द्यायचा याची योजना आखण्यात आली. हिंसाचार कोठे व कसा घडवून आणायचा? आणि गुरमीतची सुटका करून त्याला कसे पळवून न्यायचे  याची योजना तयार करण्यात आली. यासाठी वेगळे पथक नेमण्यात आले. गुरमीतला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी पोलिसांच्या व्हॅनचा पाठलाग करण्यात आला. परंतु त्यांची योजना यशस्वी ठरली नाही.  
 
राकेश इन्सा याने या बैठकीसंदर्भात पोलिसांना सांगितले की, संपूर्ण योजनेवर गुरमीत आणि आदित्य इन्सा यांच्याशी चर्चा झाली. आदित्य आजवर पोलिसांना सापडलेला नाही.  
 
पोलिसांनी तुरुंगात चौकशीची मागितली परवानगी  
डेराप्रमुखास आजवर आरोपी न करणाऱ्या एसआयटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. परंतु चौकशी पथकाकडे गुरमीतच्या विराेधात पुरावे नव्हते. आता एसआयटीकडे राकेश इन्सा हा साक्षीदार मिळाला आहे. गुरमीत रोहतकमधील सुनारिया तुरुंगात २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. यासाठी आता एसआयटी तुरुंगात जाऊन गुरमीतची चौकशी करेल. यासाठी डीजीपी कार्यालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे.  
 
आजवर हनीप्रीत व इतरांवर होता देशद्रोहाचा खटला..  
हनीप्रीतसह अनेकांवर देशद्रोहाचा आरोप आहे. आता डेराप्रमुखासही यात समाविष्ट करण्यात आले आहे. आरोपपत्रासोबत राकेश इन्सा याच्या जबाबाची प्रत जोडण्यात आली आहे. यात गुरमीत व पंचकुला दंगलीच्या लिंकची माहिती देण्यात आली आहे. गुरमीत व त्यांचा विश्वासू आदित्य इन्सा हे घटनाक्रमाआधीपासून एकमेकाच्या संपर्कात होते हेही यात दर्शवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...