आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा देण्यास पालकांचा विरोध, मुलीने मागितली ‘निर्भया’ पोलिसांची मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

झाबुआ (मध्य प्रदेश)- दहावीच्या परीक्षेस जाण्यासाठी पालकांनीच विरोध केल्याने मुलीने “निर्भया’ पोलिसांना माहिती दिली. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून काही वेळातच पोलिस मुलीच्या दारात हजर झाले. त्यांनी पालकांना कडक शब्दांत समज दिली आणि विद्यार्थिनीसोबत परीक्षा केंद्रावर पोलिस गेेले. तिचा पेपर होईपर्यंत ते केंद्रावर बसून होते. पेपर सोडल्यानंतर तिच्या घरी जाऊन त्यांनी पालकांना तिचे शिक्षण चालूच ठेवण्यास बजावले.  


ही घटना मध्य प्रदेशातील कुंदनपूर गावातील असून येथे राहणारी दीक्षा प्रमोद ठाकूर (१५) ही मुलगी दहावीत शिकते. शुक्रवारी तिचा गणिताचा पेपर होता. तिचे पालक लग्नाची तयारी करत होते. दीक्षाला पुढे  शिकवण्यास त्यांचा विरोध होता.  तिने तत्काळ ‘निर्भया’ मदत केंद्रास संपर्क साधला. तेथील प्रभारी अनिता तोमर यांच्या मोबाइलवर तिने संदेश पाठवला. त्यात म्हटले होते की, माझे वडील मला परीक्षेस बसू नको, असे सांगतात. माझे लग्न ठरवत आहेत. मी फोनवर बोलू शकत नाही. कृपया घरी येऊन मला परीक्षेला घेऊन जा. पेपर सुरू होत आहे.  


काकाला समज 

पोलिसांनी दीक्षाकडून सगळी माहिती घेतली. तेव्हा दीक्षाचे वडील घरी नव्हते. अनिता तोमर यांनी तिचे काका जयसिंह व केशवसिंह यांच्याशी चर्चा केली. त्यांना कडक  शब्दांत सांगितले, मुलीची शिकण्याची इच्छा असेल तर शिकूू द्या. जर तुम्ही जबरदस्तीने तिचे लग्न लावून देण्याचे कारस्थान केले तर तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. 

 

अन् पोलिस दारात  
परीक्षेला सुरुवात होत असतानाच निर्भया पथकास कुंदनपूरला पाेहोचण्यास वेळ लागणार होता. त्यामुळे निर्भया मदत केेंद्राच्या प्रभारी अनिता तोमर यांनी पोलिस अधीक्षक महेशचंद जैन यांच्याशी संपर्क साधला. त्यांना घटनेची माहिती दिली. पोलिस अधीक्षकांनी कुंदनपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी रामेश्वर गामड यांना मुलीचे नाव, पत्ता सांगून तिला परीक्षा केंद्रावर नेण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...