आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्रिकर म्हणाले, लष्कराला सांगायला हवे होते की, राहुल गांधींना सोबत नेऊन सर्जिकल स्ट्राइक करा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- जेव्हा सर्जिकल स्ट्रइक झाले होते तेव्हा पर्रिकर संरक्षण मंत्री होते. 

- उरी येथील प्रशिक्षण शिबिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते. 


पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत पुन्हा एकदा विरोधकांवर हल्ला चढवला आहे. सोमवारी सायंकाळी उशिला झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते म्हणाले, मला सर्जिकल स्ट्राइकवर राजकारण नको आहे. विरोधी पक्ष म्हणतात की, सर्जिकल स्ट्राइक झालेच नाही. त्यांची नकारात्मकता पाहा. मी काय तुम्हाला (विरोधकांना) सोबत न्यायचे होते का? मी लष्कराला सांगायला हवे होते की, राहुल गांधींना सोबत न्या नेऊन सर्जिकल स्ट्राइक करा. लष्कराने 2016 मध्ये 28 आणि 29 सप्टेंबरच्या रात्री सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यात 38 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. तेव्हा पर्रिकर संरक्षण मंत्री होते. 


पर्रिकर म्हणाले, सर्जिकल स्ट्राइक बाबत सर्वात मोठी बाब म्हणजे गोपनीयता. पंतप्रधान, मी, लष्करप्रमुख आणि डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स आम्हाला चौघांना याबाबत माहिती होते. आम्ही चौघे दिल्लीत होतो. कोअर कमांडर आणि ज्यांनी ही मोहीम फत्ते केली ते श्रीनगरमध्ये होते. यात वेळ घालवता येणार नव्हता म्हणून वेगाने निर्णय घेतले. 

 
विरोधक आरोप करतात 
सर्जिकल स्ट्राइकवर विरोधक केंद्र सरकारला घेरत असतात. काँग्रेसचे म्हणणे आहे की, मोदी सरकारने जवानांचे बलिदान, पराक्रम आणि साहसाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. दुसरीकडे भाजपचे असे मत आहे की, लष्कराचे मनोबल मोडीत काढणे हेच काँग्रेसचे धोरण आहे. 


38 दहशतवाद्यांना घातले होते कंठस्नान 
लष्कराने 2016 मध्ये 28 आणि 29 सप्टेंबरच्या रात्री एलओसी पार करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले होते. 125 पॅरा कमांडोजने 3 किलोमीटर आत शिरत दहशतवाद्यांच्या 7 तळांना उध्वस्त करत 38 दहशतवाद्यांना ठार केले होते. शत्रूला भनक लागू नये म्हणून जवानांनी जमिनीवर घसरत जात एलओसी पार केली होती. चार वेगवेगळ्या परिसरात असलेल्या कॅम्पवर वेगवेगळ्या टीम्सने एकाचवेळी हल्ला केला होता. 

बातम्या आणखी आहेत...