आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरत- कौशल्य आणि भावनांचे मिश्रण असलेले उदाहरण पाहायचे असेल तर पवन शर्मा यांना भेटा. त्यांनी मुलीचा बालहट्ट पुरवण्यासाठी जगातील सर्वात लहान अशी इस्त्री तयार केली आहे. तसेच त्यांनी जगातील सर्वात छोटा असा हीटरही तयार केला आहे.
या विक्रमासाठी त्यांचे नाव लिम्का बुकात नोंदले गेले आहे. शिवाय त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यांनी अनेक सूक्ष्म वस्तू तयार करण्यात नैपुण्य मिळवले आहे. शर्मा म्हणाले, एकदा त्यांची पत्नी कपड्यांना इस्त्री करत होती. तेव्हा मुलीने बाहुलीचे कपडेही इस्त्री करून देण्याचा हट्ट केला. मुलींचा हट्ट पाहून आई म्हणाली, बाहुलीचे कपडे खूप लहान आहेत. यासाठी खूप छोटी इस्त्री लागेल. त्यांचे बोलणे ऐकून पवन शर्मा यांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपणच इतकी लहान इस्त्री बनवली तर... मुलीला बाहुलीचे कपडे प्रेस करून देता येतील. त्यानंतर एक आठवडा मेहनत घेऊन त्यांनी नखाएवढ्या आकाराची इस्त्री तयार केली.
१२ व्होल्ट डीसी इलेक्ट्रिक करंटने चालते इस्त्री
ही इस्त्री तयार करण्यास त्यांना एक आठवडा लागला. यासाठी पवन शर्मा यांनी बाजारातून काही साहित्य आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर घरातील टाकाऊ वस्तू वापरल्या. यात अॅल्युमिनियम, ब्रास नट, प्लास्टिक हँडल, अॅस्बेस्टॉस, टंगस्टन वायर, स्टील स्टँड, मोबाइल चार्जर, पिन इ. चा वापर करून १७ मिमी उंच, ९ मिमी रुंद व २.५ मिमी जाडीची इस्त्री तयार केली.
पवन शर्मा यांनी नोंदवलेले विक्रम
पवन शर्मा यांनी सांगितले, सर्वात लहान इस्त्री तयार केल्यानंतर सर्वात लहान हीटर बनवला.यासाठी आशिया व लिम्का बुकमध्ये विक्रमांची नोंद झाली. शर्मा यांनी केसाला छिद्र पाडून त्यात दुसरा केस टाकण्याचा विक्रम केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.